Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीओजीएस तर्फे मेडिकोलीगल मास्टरक्लास संपन्न

पीओजीएस तर्फे मेडिकोलीगल मास्टरक्लास संपन्न

पुणे, 21 मे २०२५ : पुणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी (पीओजीएस) तर्फे नुकतेच टिळक रोड येथील आयएमए हॉलमध्ये बेटर टू प्रीपेर अँड प्रिव्हेंट दॅन रिपेअर अँड रिपीट या संकल्पनेवर आधारित मेडिकोलीगल मास्टरक्लास आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 155 हून अधिक स्त्रीरोगतज्ञ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) क्राईम, शैलेश बलकवडे आणि सन्माननीय पाहुणे म्हणून सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येम्पले उपस्थित होते.

शैलेश बलकवडे यांनी डॉक्टरांनी कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करावे, यावर भर दिला आणि वैद्यकीय समुदायाला पोलिसांच्या मदतीचे आश्वासन दिले.ते म्हणाले की, पुणे पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत जिथे डॉक्टर कोणत्याही समस्यांबाबत थेट तक्रार करू शकतात जेणे करून त्यांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते. यावेळी त्यांनी पीसीपीएनडीटी, पॉक्सो आणि एमटीपी कायद्याशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर स्पष्टता आणि मार्गदर्शन केले.

डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी महिलांचे जीव वाचवण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर, रुग्ण आणि समाज यांच्यातील परस्पर समंजसपणाचे महत्त्व अधोरेखित केले. चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय समुदाय, पोलीस आणि जनता यांच्या सहकार्याचे आवाहन त्यांनी केले

मास्टरक्लासचे नेतृत्व पीओजीएसचे अध्यक्ष डॉ. मनीष माचवे, सरचिटणीस डॉ. नीलेश बलकवडे, खजिनदार डॉ. समिधा दळवी, मेडिकोलीगल समितीच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे आणि एमटीपी समितीच्या अध्यक्षा डॉ. मधु जुनेजा यांनी केले.

याप्रसंगी पीओजीएसच्या “वूम्ब अँड वेलनेस” या मासिकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.डॉ. अनघा पैराईतुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

संवादात्मक सत्रे आणि तज्ज्ञाकडून अंतर्दृष्टी

मास्टरक्लासमध्ये “आमने सामना” सत्रांचा समावेश होता, जिथे तज्ञ आणि सहभागींनी वास्तविक जगातील वैद्यकीय कायदेशीर आव्हानांवर सक्रियपणे चर्चा केली:

पीसीपीएनडीटी, पॉक्सो आणि एमटीपी कायद्याशी संबंधित – अनसुलझेड इश्यूज: या चर्चासत्रामध्ये आरोग्याधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांसोबत डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. मधु जुनेजा आणि डॉ. चारुता जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले

द बर्निंग ट्रेन या सत्रात – आपत्कालीन सेवा, रेफरल्स, एथिक्स, अॅडव्हान्स पेमेंट्स आणि डिपॉझिट्स याविषयावर डॉ. संजय गुप्ते, डॉ. मनीष माचवे आणि डॉ. मीनाक्षी देशपांडे यांच्या यांनी मार्गदर्शन केले , डॉ. समिधा दळवी आणि डॉ. तनुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मास्टरक्लास कार्यक्रमात डॉ. गिरीश कुमठेकर (सोलापूर), डॉ. सुदेश दोशी (पंढरपूर),डॉ. दिलीप सारडा (पुणे),डॉ. जयंत नवरंगे (पुणे),अ‍ॅड. रोहित एरंडे (कायदेशीर तज्ञ),डॉ. वर्षा डांगे, डॉ. उमा वानखेडे आणि डॉ. मिलिंद सोनवणे आदी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments