स्त्रोतांपर्यंत पोहोच सोपी करणे या माध्यमातून एमएसएमईंना जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवता येईल. परिणामी हे क्षेत्र मजबूत होईल आणि देशभरात शाश्वत आर्थिक विकास आणि सर्वसमावेशक वाढ साधली जाईल.”
ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश जैन म्हणाले, “एमएसएमईंची शाश्वत वाढ साधण्यासाठी त्यांना औपचारिक कर्जप्रवाहात सहज प्रवेश मिळणे आणि ऋण व्यवस्थापनाचे योग्य मार्गदर्शन त्यांना मिळणे अत्यावश्यक आहे. व्यवसाय चक्रातील चढउतारांचा सर्वाधिक फटका एमएसएमईंना बसतो कारण त्यांच्याजवळ आवश्यक तो आर्थिक साठा किंवा आधार नसतो. त्यामुळे, या क्षेत्राला सातत्यपूर्ण आधार देणे आणि त्यांना सक्षम आर्थिक व्यवस्थापनासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.”


