Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाशिकमध्ये रा.स्व.संघाच्या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे सघोष संचलन

नाशिकमध्ये रा.स्व.संघाच्या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे सघोष संचलन

नाशिक, ता. २७, मंगळवार ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षित स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन अनुभवण्याची संधी नाशिककरांना मंगळवारी (दिनांक २७ मे) मिळणार आहे. संघाच्या पश्चिम क्षेत्राचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग– प्रथम’ (सामान्य) वर्ग नाशिकमध्ये सुरु आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून आलेल्या २८५ स्वयंसेवकांचे सघोष संचलन संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनीटांनी विद्याप्रबोधिनी शाळा (भोंसला) येथून प्रारंभ होईल.

संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील स्वयंसेवकांचा प्रशिक्षणात सहभाग आहे. यामध्ये शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर्स, वकिल, व्यापारी, शिक्षक आदिंसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशभक्ती, शारिरीक व बौध्दिक विषयाचे या संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच शिस्ती, वेळेचा सदुपयोग, आदींचे प्रशिक्षण दिले जाते. मंगळवार (ता.२७) सायंकाळी या प्रसंगी वर्गाचे सर्वाधिकारी विष्णु वझे, कार्यवाह जयदीप धर्माधिकारी हे प्रशालेच्या मैदानावर संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांचे संपूर्ण गणवेशातील संचलन (एकत्रीकरण व सुरूवात) होणार आहे.

यानिमित्ताने शहरवासियांना संघ शिक्षा वर्गात देशभक्तीने भारावलेल्या स्वयंसेवकांना दिल्याजाणाऱ्या प्रशिक्षणाची व देशभक्तीची चुणूक पहायला मिळणार आहे. पथसंचलन मार्गावर घोषवादनाच्या निनादात निघणारे हे संचलन पाहण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नाशिककरांना करण्यात आले आहे. पथ संचलनाचा मार्ग खालीलप्रमाणे असणार आहे.

मार्ग :- विद्याप्रबोधिनी शाळा(भोंसला), नंदन स्वीट्स, शहीद सर्कल, प्रसाद सर्कल, आकाशवाणी भाजी मार्केट, मधुर स्वीट्स, सावरकर गेट (भोंसला), जेहान सर्कल, विद्याप्रबोधिनी शाळा(भोंसला) असा संचलनाचा मार्ग असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments