Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedतंबाखूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ लक्षणीयरित्या महाग करावेत - तज्ञ

तंबाखूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ लक्षणीयरित्या महाग करावेत – तज्ञ

पुणे,30 मे 2025 : जगजागृती होत असूनही विविध प्रकारच्या तंबाखूचे सेवन वाढतच आहे. या गोष्टीला आळा घालण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ लक्षणीयरित्या महाग करणे आणि दुसरीकडे या सवयी सोडण्यासाठी लोकांना मदत करणे महत्त्वाचे ठरेल असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.

31 मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे च्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जागृती केली जाते.यावर्षीची संकल्पना ही अनमास्कींग द अपील – एक्सपोजिंग इंडस्ट्री टॅक्टीक्टस ऑन टोबॅको ॲन्ड निकोटीन प्रॉडक्टस ही असून तंबाखू उत्पादनांच्या प्रसाराला बळी न पडण्यावर भर देते.

विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील कर्करोग शल्यचिकित्सक डॉ.अनूप ताम्हणकर यांच्या मते,तंबाखू ही सर्व स्वरूपात तेवढीच हानीकारक असते.यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.त्यातील सर्वात सामान्यपणे आढळणारा म्हणजे तोंडाचा कर्करोग. आणि त्यानंतर अन्ननलिका व फुफ्फुसाचा कर्करोग. दुर्दैवाने इतकी जनजागृती होऊन देखील समाजात धुम्रपानाला हवा तेवढा विरोध होत नाही. धुम्रपान करणे ही करमणूक किंवा आनंद घेण्याची बाब नसून ती केवळ स्वत:साठीच नाही तर तुमच्या आसपासच्या लोकांनाही नुकसानकारक ठरू शकते,हा संदेश देण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले की,तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन,आयात थांबवून त्याच्या किंमती लक्षणीयरित्या वाढविण्याची गरज आहे,तरच तरूण यापासून दूर राहतील.ज्यांना याची सवय आहे,त्यांनी सोडून देण्याचा दृढ निश्चय हा पुढील दुष्परिणामांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल.

विश्वराज हॉस्पिटल येथील ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ.रजत भेंडे म्हणाले की,चुकीच्या सवयी सोडण्याच्या निश्चयाव्यतिरिक्त त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे अशा लोकांचे समुपदेशन करणे. समुपदेशन सत्रांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल सखोल माहिती दिली जाते.कुठल्याही स्वरूपातील तंबाखू हानीकारक असून त्यामुळे अनेक कर्करोग होऊ शकतात.तंबाखू सोडून दिली किंवा मर्यादित कालावधीकरिता त्याचे सेवन केले तरीही काही काळाकरिता याची जोखीम राहू शकते. अशा प्रकारची उदाहरणे देत आम्ही समुपदेशन करतो. याचे कारण एकदा कर्करोगाचे निदान झाले की,रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना मानसिक,भावनिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.यातील सकारात्मक बाब म्हणजे अनेक रूग्ण अशा समुपदेशनला चांगला प्रतिसाद देत सवयी सोडण्याचा प्रयत्न करतात.ज्यांना तंबाखू बरोबर मद्यपानाची सवय आहे,त्यांच्यासाठी मानसोपचारतज्ञांची देखील मदत घेतली जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments