Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘लिसन टू युअर दिल ऑर द डिल्‍स. यू...

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून ‘लिसन टू युअर दिल ऑर द डिल्‍स. यू विल ब्रिंग होम ए ह्युंदाई’ मोहिम लाँच, ज्‍यामध्‍ये आहेत पंकज त्रिपाठी

गुरूग्राम । २ जून २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज नवीन मोहिम ‘लिसन टू युअर दिल ऑर द डिल्‍स. यू विल ब्रिंग होम ए ह्युंदाई!’ लाँच केली, ज्‍यामध्‍ये नवीन ऑनबोर्ड करण्‍यात आलेले ब्रँड अॅम्‍बेसेडर आणि प्रख्‍यात अभिनेते पंकज त्रिपाठी आहेत.

लक्षवेधक वातावरणामध्‍ये स्थित मोहिमेची जाहिरात पंकज त्रिपाठी व त्‍यांच्‍या शेजाऱ्यांमधील विनोदी व हलक्‍याफुलक्‍या संवादांना सादर करते, जेथे ते विनोदीशैलीमध्‍ये त्‍यांच्‍या ह्युंदाई एक्‍स्‍टरमधील वैशिष्‍ट्यांना दाखवतात. तसेच ते शेजाऱ्यांना विचारतात की त्‍यांच्‍या कारमध्‍ये अशी वैशिष्‍ट्ये आहेत का? किंवा त्‍यांनी त्‍यांच्‍या नवीन कारवर आकर्षक डिल्‍सचा आनंद घेतला आहे का? या मोहिमेतून स्‍पष्‍ट होते की, अद्भुत डिल्‍स संदर्भात किंवा तुमच्‍या महत्त्वाकांक्षेनुसार उत्तम वेईकलची निवड करताना ह्युंदाई आपसूकच अग्रस्‍थानी आहे. पंकज यांची ट्रेडमार्क शैली आणि लक्षवेधक करिष्‍मा कथानकामध्‍ये उत्‍साहाची भर करतात, ज्‍यामुळे मोहिम संस्‍मरणीय व समर्पक बनते.

या नवीन मोहिमेच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलच्‍या मार्केटिंगचे व्‍हर्टिकल हेड श्री. विराट खुल्‍लर म्‍हणाले, “लिसन टू युअर दिल ऑर द डिल्‍स. यू विल ब्रिंग होम ए ह्युंदाई’ ही मोहिमेपेक्षा अधिक अपवादात्‍मक मूल्‍य व मालकीहक्‍क अनुभवासह वैशिष्‍ट्य-संपन्‍न आणि विश्वासार्ह वेईकल्‍स वितरित करण्‍याप्रती एचएमआयएलच्‍या दीर्घकालीन कटिबद्धतेचे सेलिब्रेशन आहे. या टप्‍प्‍यादरम्‍यान ही मोहिम लाँच करणे धोरणात्‍मक निर्णय आहे, जेथे कार खरेदी करण्‍याचा प्रवास लांबचा असण्‍यासोबत खूप विचार केला जातो. सणासुदीच्‍या काळापूर्वी मोहिम लाँच करत आमचा लवकरच विचार करण्‍याला प्राधान्‍य देण्‍याचा, उद्देशावर परिणाम करण्‍याचा आणि ग्राहकांना कार खरेदी करण्‍याच्‍या विचारामध्‍ये ह्युंदाईला प्राधान्‍य देण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. पंकज त्रिपाठी यांची नैसर्गिक मोहकता व विश्‍वासार्हतेसह आम्‍ही मोहिम डिझाइन केली आहे, जी मनोरंजन करण्‍यासोबत ग्राहकांमध्‍ये ह्युंदाई ब्रँडबाबत आत्‍मविश्‍वास देखील निर्माण करते. यामधून ग्राहकांच्‍या प्रत्‍येक प्रवासामध्‍ये त्‍यांच्‍याशी कनेक्‍टेड राहण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

ही सर्वांगीण मोहिम टीव्‍ही, प्रिंट, डिजिटल आणि रेडिओ प्‍लॅटफॉर्म्‍सवर राबवण्‍यात येईल, ज्‍यामधून भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत व्‍यापक पोहोच व सहभागाची खात्री मिळेल. या एकीकृत कम्‍युनिकेशनच्‍या माध्‍यमातून एचएमआयएल विश्‍वास, केअर आणि तंत्रज्ञान सर्वोत्तमतेचा आपला वारसा अधिक दृढ करत आहे. प्रादेशिक प्रेक्षकांशी संलग्‍न होण्‍यासाठी ही टीव्‍हीसी गुजराती, मराठी, बंगाली, कन्‍नड, मल्‍याळम, तमिळ आणि तेलुगू या सात प्रादेशिक भाषांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे विविध भौगोलिक प्रदेशांमध्‍ये प्रबळ व दीर्घकालीन प्रभावाची खात्री मिळते.

एचएमआयएलच्‍या नाविन्‍यता, विश्‍वसनीयता, विश्‍वास आणि मूल्‍य या मुलभूत तत्त्वांमध्‍ये खोलवर सामावलेली ‘लिसन टू युअर दिल ऑर द डिल्‍स. यू विल ब्रिंग होम ए ह्युंदाई’ मोहिम धमाल व आश्‍वासानामध्‍ये परिपूर्ण संतुलन राखते, तसेच स्‍पर्धात्‍मक बाजारपेठेत ह्युंदाई वेईकलला वरचढ ठरवणाऱ्या पैलूला कॅप्‍चर करते. ही मोहिम सर्वांना आठवण करून देते की प्रत्‍येक हयुंदाई कारमागे केअर, विश्‍वास आणि भरवशाचे वचन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments