कूपर कॉर्पोरेशनचे फ्लॅगशिप 10 केव्हीए आणि 25 केव्हीए गॅस जेनसेट ही ईपीए मान्यताप्राप्त एकमेव इंजिन्स आहेत, जी प्रथमच भारतातून निर्यात करण्यात येणार आहेत. ~
पुणे : कूपर कॉर्पोरेशन या इंजिन्स, इंजिनचे पार्टस आणि जनरेटर तयार करणाऱ्या जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कंपनीतर्फे आपल्या गॅसवर चालणारी जनरेटर सेट्सची पहिली मोठी शिपमेंट अमेरिकेत पाठविण्यात येत असल्याची घोषणा केली. हा महत्त्वाचा टप्पा कूपरच्या फुल-स्केल एक्स्पोर्टची सुरुवात म्हणून ओळखला जातो. या अंतर्गत यूएस एन्व्हायरन्मेंटल एजन्सी (ईपीए) मान्यताप्राप्त 5 केव्हीए ते 500 केव्हीए पर्यंतचे जनरेटर सेट्स निर्यात करण्यास कंपनी सज्ज आहे.
कूपर कॉर्पोरेशनचे फ्लॅगशिप 10kVa आणि 25kVa गॅस जनरेटर सेट्स ही भारतातील ईपीए-प्रमाणित असलेली एकमेव इंजिन्स आहेत, जी कंपनीच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि पर्यावरणीय अनुपालनासाठीच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहेत. विशेषतः 25kVa व्हेरिएंटला अमेरिकन बाजारापेठेत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकेसोबतच सिन्फोनिया या जपानी भागीदाराच्या सहयोगाने कूपरतर्फे व्ही-ट्विन एलपीजी 10 kVa जेनसेट्स जपानमध्ये निर्यात करण्यात येत आहेत. या आंतरराष्ट्रीय विस्तारीकरणातून कूपरचे जागतिक पॉवर सोल्यूशन क्षेत्रातील वाढते अस्तित्व दिसून येते.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख एन. कूपर म्हणाले, “कूपर कॉर्पोरेशनसाठी आज एक ऐतिहासिक व अभिमानास्पद महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. कारण आज आम्ही ईपीए मान्यताप्राप्त जेनसेट्सची निर्यात अमेरिकेत करण्यास सुरुवात करत आहोत. इनोव्हेशन, दर्जा आणि जागतिक पातळीवरील पर्यावरणीय मानकांचे अनुपालन करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेचे हे द्योतक आहे. या क्षेत्राचे उद्गाते आणि ईपीएचे अनुपालन केलेले 25kVa जेनसेटचे एकमेव भारतीय मॅन्युफॅक्चरर म्हणून 25kVa क्षमतेची पहिली शिपमेंट अमेरिकेत पाठवताना आम्हाला अभिमान वाटत आहे. तसेच सिन्फोनियाच्या भागीदारीने जपानमध्ये व्ही-ट्विन एलपीजी 10kVa क्षमतेचे जेनसेट्स निर्यात करून आमचे जागतिक पातळीवरील अस्तित्व विस्तारण्यात येत आहे.”
देशांतर्गत स्तरावर, आमच्या इंजिन्सनी भारतीय संरक्षण दलांची 10 वर्षांहून अधिक काळ विश्वासार्हपणे सेवा केली आहे, त्यात ऑपरेशन सिंदूर देखील समाविष्ट आहे, आणि फेब्रुवारी 2025 मध्ये आमच्या 50 एचपीच्या ट्रॅक्टर्सना भारतात भरघोस प्रतिसाद लाभला. आमच्या टीमचे अथक प्रयत्न, ग्राहकांनी व पुरवठादारांनी ठेवलेला विश्वास आणि साताऱ्यात खोलवर रुजलेली आमची पाळेमुळे आणि शतकभराचा वारसा यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले आहे. आमचे संस्थापक सर धनजीशाह बी. कूपर यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वांमुळे आज जगभरातील बाजारपेठांसाठी जागतिक दर्जाची, भारतात तयार केलेली ऊर्जा निर्मिती उत्पादने पुरवण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत.
उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या दशकभरापासून भारतीय संरक्षण दलातही कूपर इंजिन्सचा वापर होत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या इंजिनांनी महत्त्वाची भूमिका निभाली. आव्हानात्मक परिस्थितीत त्यांचा संरचनात्मक भक्कमपणा व विश्वासार्ह कामगिरीला संरक्षण दलाची प्रशंसा लाभली.
कूपर कॉर्पोरेशनला अभियांत्रिकी उत्कृष्टता व राष्ट्रीय विकासाप्रती असलेल्या प्रतिबद्धतेचा 100 वर्षांचा वारसा लाभला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय साताऱ्यात असून सर धनजीशाह बी. कूपर हे त्याचे संस्थापक आहेत. ते मुंबई इलाख्याचे पहिले मुख्यमंत्री होते. सातारा जिल्ह्यातून आजपर्यंत महाराष्ट्राला पाच मुख्यमंत्री लाभले आहेत. या समृद्ध वारशामुळे नावीन्यतेला चालना देण्याच्या आणि भारताच्या प्रगतीमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याच्या कूपरच्या धेय्यपूर्ण वाटचालीस सातत्याने प्रेरणा मिळत आहे.
चार दशकांहून अधिक काळापासून कूपरच्या उत्पादनांचा अमेरिकन बाजारपेठेत मोठा प्रभाव आहे. सातत्यपूर्ण यशाचा वारसा राखत कूपरने नाविन्यता, विश्वासार्हता व उत्तम कामगिरीची परंपरा कायम राखली आहे.
या यशस्वी प्रवासाला फरोख एन. कूपर यांचे कुशल नेतृत्व व दूरदृष्टी लाभली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेनसेट मटेरिअल सप्लायर्स, अधिकारी, कामगार व कर्मचारी यांच्या अविरत बांधिलकीमुळे सातत्यपूर्ण वाढ व जागतिक पातळीवर ठसा उमटविणे शक्य झाले आहे.


