पुणे, 3 जून २०२५ : फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम तर्फे कुटुंबियांसाठी हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन च्या अनोख्या जगात घेऊन जाणारा अनुभव देण्यासाठी गुंतवून ठेवणारा उपक्रम आयोजित केला आहे. प्रसिध्द ड्रीमवर्क्स आणि युनिव्हर्सल्स पिक्चर्स या चित्रपटापासून प्रेरित होऊन मॉलमधील फॅन पार्कला बर्गच्या पौराणिक वायकिंग गावामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.यामुळे मुलांना आणि पालकांना अविस्मरणीय साहस अनुभव मिळेल. हा अनुभव भेट देणाऱ्यांना 8 जून 2025 पर्यंत उपलब्ध असेल.याअंतर्गत 30बाय30 फुटाचा विशेष डिझाईन केलेला इंटरॲक्टिव्ह झोन असून तपशीलवार सेट साहित्य,गुंतवून ठेवणारे उपक्रम,कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या सर्जनशील कार्यशाळांद्वारे चित्रपटाला जिवंत केले जाईल.
– कुटुंबांसाठी येथे काय आहे.
या अनुभवांमधून प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
* ड्रॅगन ट्रेनिंग अरेना – रिंग द वायकिंग,फाईंड युवर ड्रॅगन आणि ड्रॅगन ट्रेल सारख्या रोमांचक आव्हानांमध्ये लहान मुले सहभागी होऊ शकतात. यामध्ये त्यांचे कौशल्याची परीक्षा होऊन धाडसी ड्रॅगन ट्रेनर्समध्ये ते स्थान मिळवू शकतात.
* हीकप्स वर्कशॉप्स – हा एक क्रिएटिव्ह हब असून मुले स्वत:चे वायकिंग शिल्ड डिझाईन करू शकतात आणि आपल्या आवडत्या ड्रॅगनचे चित्रण करू शकतात.
* स्टॉईक्स थ्रोन रूम – कुटुंबांना एकत्र येऊन अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी आकर्षक बॅकड्रॉप्सवर फोटो घेण्याची संधी मिळेल.
फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे केंद्र संचालक विक्रम पै म्हणाले की,कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.हा उपक्रम कुटुंबीय व लहान मुलांसाठी अनोखे,आकर्षक मनोरंजन देण्याच्या आमच्या वचनबध्दतेचा एक भाग आहे.
हा उपक्रम सर्व भेट देणाऱ्यांसाठी मोफत व खुला आहे.तुम्ही टुथलेस,हिकप किंवा फक्त साहसी ॲवॉर्ड बाळगणारे असाल तर सुट्टीत उत्साह,सर्जनशीलता आणि आठवणी जपून ठेवण्याची अविस्मरणीय संधी मिळेल.
ड्रॅगनच्या भूमीचा शोध घेण्यासाठी या – फक्त फॅनपार्कमध्ये,आणि फक्त 8 जून पर्यंत


