Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorized११०० कोटी रुपयांच्या संधी सह हिरानंदानी कम्युनिटीज तर्फे पनवेल मध्ये ‘ दि...

११०० कोटी रुपयांच्या संधी सह हिरानंदानी कम्युनिटीज तर्फे पनवेल मध्ये ‘ दि अरेना’ची घोषणा हिरानंदानी फॉर्च्युन सिटी मधील लक्झरी स्पोर्ट्स थीम वर आधारीत निवासी घरे ‍

मुंबई, भारत, ५ जून २०२५- हिरानंदानी कम्युनिटीज या निरंजन हिरानंदानी उपक्रमा तर्फे आज नवीन लक्झरी ‍निवासी क्षेत्र असलेल्या ‘दि अरेना’ ची सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली. दि अरेना ही योजना स्पोर्टी लाईफस्टाईल या थीमवर आधारीत योजना असून ती हिरानंदानी फॉर्च्युन सिटी येथे १० एकरांवर पसरलेला हा प्रकल्प आहे. या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पा मध्ये आठ आकर्षक टावर्स मध्ये २, ३ आणि ४ बीएचकेच्या सदनिका असतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ग्रीनफील्ड, आर्केडिया आणि सिटॅडेल असे तीन टावर्स असून यांत ६०० हून अधिक घरे आहे, पनवेल मध्ये हिरानंदानीच्या पंरपरेनुसार ही घरे ग्राहकांना आमंत्रित करत आहेत.

मान्यता आणि प्राथमिक अंदाज

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला रेराची मान्यता मिळाली असून यामध्ये तीन टावर्सचा समावेश आहे, या प्रकल्पा कडून ११०० कोटी रुपयांच्या महसूलाची निर्मिती होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बदलात्मक अशा गुंतवणूकीच्या आकडेवारी नुसार यामुळे मोठे आर्थिक मुल्य निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजोड सुविधा आणि जागतिक स्तरावरील राहणीमान

अरेना मध्ये ८० हून अधिक लाईफस्टाईल थीम्ड सुविधा असून यांत १० हून अधिक कोर्ट वर आधारीत सुविधा, आरामदायक इनडोअर उपाय आणि योग्य पध्दतीने तयार करण्यात आलेल्या वेलनेस आणि लीझर स्पेसेसचे डिझाईन हे विविध पिढ्यांतील नागरिकांसाठी करण्यात आले आहे. अचूकपणे संकल्पनेने युक्त अरेना मध्ये सर्वसमावेशक राहणीमानासह नागरिकांना त्यांचे स्वत:चे खेळाचे मैदान आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी आवश्यक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक पिढीसाठी उर्जावान जागा

अरेना मध्ये प्रथमच घर खरेदी करु इच्छिणार्‍या मिलेनियल्स सह राहण्यास उत्सुक असणार्‍या लोकांसाठी असून यामध्ये ॲक्टिव्ह आणि आरामदायक राहणीमानाची अपेक्षा ठेवणार्‍या ग्राहकांसाठी योग्य आहे. या स्पोर्टी ॲक्टिव्हिटी वर आधारीत घरांमध्ये लोकसंख्यात्मक आकर्षण असून यामध्ये स्थानिक खरेदीदार, स्थानिक गुंवणूकदार आणि एनआरआय जनता यांचा समतोल असून मुंबई ३.० आता आर्थिक वाढीचे केंद्र बनत आहे. त्याच बरोबर यामध्ये प्रतिथयश असे हिरानंदानी घर खरेदी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही आकर्षक निवासस्थाने अतिशय स्पर्धात्मक अशा किंमतीत आहेत. २ बीएचके चे घर हे १.३१ कोटींपासून सुरु आणि ३ व ४ बीएचके घरे हे १.७७ कोटींपासून पुढच्या दरात उपलब्ध असून यामुळे आता लवकर प्रवेशाची मोठी संधी यामध्ये मिळणार आहे.

वाढ आणि बदलाचा दृष्टिकोन

कंपनीच्या प्रवक्त्याच्या मते “ अरेना हे केवळ एक निवासी संकूल नाही तर हे लक्झरी मधील आकर्षक जीवनशैलीसाठीचे आमंत्रण आहे. प्रेस्टिज सह आकर्षकता यासाठीचे डिझाईन करण्यात आले असून यामध्ये रोजच्या जीवनशैली चा समतोल राखण्यात आला आहे. आकर्षक अशा हिरानंदानी परंपरेशी जोडले जाऊन सर्वोत्कृष्टता, वेलनेस आणि वेगळेपणाचा अनुभव घ्या. प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करुन तयार करण्यात आलेल्या स्वप्नातील घरांचा संपूर्ण वापर करुन आजची जीवनशैली वाढवा आणि पनवेलच्या सर्वाधिक आकर्षक आणि डायनॅमिक निवासाचा समृध्द अनुभव मिळवा.”

सध्या पनवेल मध्ये मोठे बदल होत आहेत. महत्त्वपूर्ण स्थानासह आकर्षक पायाभूत सुविधांचा विकास, यामुळे घरखरेदीदारांसह गुंतवणूकदारांसाठी सुध्दा हे एक आकर्षक स्थान बनले आहे. अरेना मध्ये हिरानंदानींची अजोड लक्झरी आणि सोपेपणा देण्यासाठी असलेली वचनबध्दता अधोरेखित होत आहे. हा प्रकल्प म्हणजे केवळ घरे बांधणे नव्हे तर अशा समाजाची निर्मिती करणे ज्यामध्ये नागरिकांना या भागातील सातत्यपूर्ण होणार्‍या वाढीत सहभागी होण्याची संधी ‍मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments