Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे आवाहन

माजी सैनिकांना नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे आवाहन

पुणे, दि. 9 : सध्याची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील आर्मी, नेव्ही व एअर फोर्स मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक यांनी नागरी संरक्षक दलामध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी सिव्हील डिफेन्स वॉरीअर या वेबसाईटवर किंवा अॅपवर नोंदणी करावी. जेणेकरुन त्यांच्या उपलब्धतेनुसार नागरी संरक्षण दलाचे मुलभूत प्रशिक्षण देणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments