Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेश

पुणे, दि. 9 : अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर अशा तिनही प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग संमिश्र केंद्र येरवडा येथे इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत (वयोगट 06 ते 18 वर्ष) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अधीक्षिका रोहिणी मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

या केंद्रात प्रशिक्षित शिक्षक वर्ग, डिजिटल शिक्षण, दर्जेदार वसतीगृह, भौतिक उपचार, व्यवसाय उपचार समाज उपचार, वैद्यकिय मदत, व समुपदेशन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया यांसारख्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम आणि नैतिक मुल्यांचे शिक्षण केंद्रात दिले जाते. प्रवेशासाठी संपर्क शासकीय वहुउददेशिय दिव्यांग संमिश्र केंद्र, गोल्फ क्लब रोड (औद्यागिक शाळेच्या बाजुला), येरवडा, पुणे येथे किंवा मोबाईल नंबर : मोरे-9763895598, वाघ-9960233823, सोनवणे-9226959371, कारंडे-9765077666, सरोदे-9730515597 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments