Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडियातर्फे महाराजा क्लबच्या सदस्यांसाठी अमेरिका व युकेमध्ये नवीन शॉपिंग रिवॉर्ड्स जाहीर

एयर इंडियातर्फे महाराजा क्लबच्या सदस्यांसाठी अमेरिका व युकेमध्ये नवीन शॉपिंग रिवॉर्ड्स जाहीर

गुरुग्राम, १० जून २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने लॉयल या ब्लॉकचेन- पॉवर्ड लॉयल्टी सुविधा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसह नवीन भागिदारी जाहीर केली आहे. या नव्या भागिदारीअंतर्त महाराजा क्लब सदस्यांसाठी दररोज रिवॉर्ड्स जाहीर केले जाणार असून त्यामुळे त्यांना अमेरिका व युकेमध्ये लोकप्रिय जागतिक ब्रँड्सच्या खरेदीवर महाराजा पॉइंट्स मिळवता येणार आहेत.

महाराजा क्लबच्या सदस्यांना आता वॉलमार्ट, व्हिक्टोरियाज सिक्रेट, न्यू बॅलन्स, गॅप, व्हिक्टोरीनॉक्स आणि अलामो यांसारख्या ब्रँड्सच्या खरेदीवर महाराजा पॉइंट्स मिळवता येणार आहेl. यामध्ये आणखी पार्टनर्स समाविष्ट होणार असल्यामुळे जास्तीत जास्त रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी सदस्यांना मिळणार आहे.

फॅशनपासून सौंदर्य आणि रोज लागणाऱ्या वस्तूंपर्यंत या संधींमुळे सदस्यांना रोजच्या खरेदीवर पॉइंट्स गोळा करतील व हे पॉइंट्स त्यांना एयर इंडियाकडे प्रवासाशी संबंधित रिवॉर्ड्स मिळवून देतील. हे पॉइंट्स अवॉर्ड्स फ्लाइट्स किंवा कॅबिन अपग्रेडसाठी रिडीम करता येतील.

अर्निंग रेट हा प्रत्येक ब्रँडनुसार वेगळा असून त्यामुळे सदस्यांना वेगवेगळ्या विभागात त्यांचे पॉइंट्स वाढवण्याचे विविध मार्ग मिळणार आहेत.

ब्रँड

मिळवता येण्यासारखे महाराजा पॉइंट्स

वॉलमार्ट

खर्च केलेल्या प्रत्येक १०० डॉलर्सवर ९९ पर्यंत महाराजा पॉइंट्स

व्हिक्टोरियाज सिक्रेट

प्रत्येक खर्च केल्या जाणाऱ्या १०० जीबीपीवर ३१० महाराजा पॉइंट्स

व्हिक्टोरीनॉक्स

खर्च केलेल्या प्रत्येक ३०० डॉलर्सवर १०० महाराजा पॉइंट्स

न्यू बॅलन्स

खर्च केलेल्या प्रत्येक १०० डॉलर्सवर ४५ महाराजा पॉइंट्स

गॅप

खर्च केलेल्या प्रत्येक १८० डॉलर्सवर १०० महाराजा पॉइंट्स

अलामो

खर्च केलेल्या प्रत्येक १०० डॉलर्सवर ६४ महाराजा पॉइंट्स

एयर इंडियाच्या वेबसाइटवर (https://bit.ly/MaharajaClubPartners), महाराजा क्लब पार्टनरच्या पेजवर ऑफर्स उपलब्ध आहेत, जिथे सदस्यांना त्यांच्या आवडीचा ब्रँड निवडून पुढील स्टेप्स घेता येतील.

‘लॉयलसह भागिदारी करून महाराजा कल्ब आमच्या जगभरातील वाढत्या सदस्यांसाठी आणखी लाभदायक करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे लॉयल्टी, एयर इंडियाचे प्रमुख शैलेश कुमार सिंग म्हणाले. या भागिदारीमुळे आमच्या सदस्यांना सतत प्रवास न करताही दैनंदिन खरेदीवर महाराजा पॉइंट्स मिळवता येणार आहेत. अशा प्रकारच्या खरेदीतून मिळालेले पॉइंट्स आणि प्रवासातून मिळालेले पॉइंट्स एकत्र करून सदस्यांना मोफत फ्लाइट्स किंवा कॅबिन अपग्रेडसारखे लाभ लगेचच मिळवा येतील व एयर इंडियासह प्रवासाचा सुखद अनुभव घेता येईल.

‘जगभरातील पार्टनर्सच्या विस्तारित नेटवर्कद्वारे महाराजा क्लबचा अनुभव आणखी आनंददायी करण्यासाठी एयर इंडियासह काम करताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे लॉयलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार सिंग म्हणाले. ‘या उपक्रमामुळे महाराजा क्लब सदस्यांची पॉइंट्स मिळवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल, कारण त्यांना आता अमेरिका व युकेमध्ये दैनंदिन खरेदीवर हे पॉइंट्स मिळवता येणार आहेत. महाराजा क्लब विशेष सेवा देण्यासाठी, सदस्यांना खास वागणूक देण्यासाठी व त्यांना प्रत्येक वेळी सन्माननीय अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एकत्रितपणे आम्ही एयर इंडियासोबतचा प्रवास असामान्य, दैनंदिन आयुष्य अर्थपूर्ण संधींसह समृद्ध करणारा व प्रवासाचा अनविस्मरणीय अनुभव देणारा करण्यासाठी उत्सुक आहोत.’

एयर इंडियाने नुकताच त्यांचा फ्रिक्वेन्ट फ्लायर प्रोग्रॅम अद्ययावत करत त्याचे महाराजा क्लब असे रिब्रँडिंग केले आहे. त्याची बांधणी जास्त सुलभ आणि ग्राहकांसाठी सोपी केली आहे. यातील स्तरांनाही नवी नावे देण्यात आली असून प्रोग्रॅमची ओळखही अद्ययावत करण्यात आली आहे.

एयर इंडिया कंपनी स्टार अलायन्सचा भाग असून एयरलाइनचे इतर स्टार अलायन्स सदस्य एयरलाइन्ससह सहकार्य असल्यामुळे महाराजा क्लबच्या सदस्यांना जागतिक स्तरावर अलायन्सच्या मोठ्या नेटवर्कअंतर्गत आणखी खास लाभ मिळतील.

गेल्या १८ महिन्यांत एयर इंडियाने महाराजा क्लबमध्ये ५० भागिदारांना समाविष्ट केले असून त्यामुळे जास्त सोयीस्करपणा, जास्त रिवॉर्ड्स आणि सदस्यांना खास लाभ मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments