Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑर्कला इंडिया कडून सेबीकडे डीआरएचपी दाखल

ऑर्कला इंडिया कडून सेबीकडे डीआरएचपी दाखल

एमटीआर फुड्स आणि Eastern Condiments या ब्रँड्सची मालकी असलेल्या ऑर्कला इंडियाने आपल्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

कंपनीचा आयपीओ हा पूर्णतः ऑफर फॉर सेल (OFS) स्वरूपात असून, यामध्ये प्रवर्तक आणि इतर समभागधारकांकडून 2.28 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. या OFS अंतर्गत, प्रवर्तक ऑर्कला एशिया पॅसिफिक पीटीई तसेच समभागधारक नवाज मीरन आणि फिरोज मीरन आपल्या शेअर्सची विक्री करणार आहेत.

सध्या प्रवर्तक ऑर्कला एशिया पॅसिफिक पीटीई लिमिटेड आणि नॉर्वेजियन औद्योगिक गुंतवणूक कंपनी ऑर्कला ASA यांच्याकडे मिळून कंपनीतील 90 टक्के हिस्सा आहे, तर नवाज मीरन आणि फिरोज मीरन यांच्याकडे कंपनीतील प्रत्येकी 5 टक्के हिस्सा आहे.

ऑर्कला इंडिया पूर्वी एमटीआर फुड्स म्हणून ओळखली जात होती. ही एक बहुवर्गीय भारतीय अन्नप्रक्रिया कंपनी आहे. ती एमटीआर, रसोई मॅजिक आणि ईस्टर्न यांसारख्या प्रमुख ब्रँड्स अंतर्गत मसाले आणि मसाला मिश्रणे, रेडी-टू-ईट मिठाई व ब्रेकफास्ट मिक्स यांसारखी उत्पादने तयार करते.

Technopak अहवालानुसार आर्थिक वर्ष 19 च्या तुलनेत 10.8 टक्के CAGR दर्शवत आर्थिक वर्ष 24 मध्ये भारतीय पॅकेज्ड फूड बाजारपेठ अंदाजे 10.18 लाख कोटी रु. होती.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी हे या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments