Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*मॉन्ट वर्ट ग्रुपचा कझाकिस्तानमध्ये 500 मिलियन डॉलरचा करार, वैद्यकीय विद्यापीठ व रुग्णालय...

*मॉन्ट वर्ट ग्रुपचा कझाकिस्तानमध्ये 500 मिलियन डॉलरचा करार, वैद्यकीय विद्यापीठ व रुग्णालय उभारणार*

पुणे : पुणेस्थित प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनी मॉन्ट वर्ट ग्रुप ने कझाकिस्तानमधील बिग बी कॉर्पोरेशनसोबत ५०० मिलियन डॉलर (अंदाजे ₹४३०० कोटी) किमतीचा करार केला आहे. या कराराअंतर्गत कझाकिस्तानमध्ये वैद्यकीय विद्यापीठ आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे.

ही घोषणा SRAM & MRAM ग्रुपच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त लंडनच्या Raven’s Ait प्रायव्हेट आयलंड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी श्री. जयंतीलाल कनारिया, चेअरमन, मॉन्ट वर्ट ग्रुप, श्री. नीरज कनारिया, एमडी, मॉन्ट वर्ट ग्रुप श्री. अजय भंडारी, डायरेक्टर, बिग बी कॉर्पोरेशन (कझाकिस्तान), श्री. महेंद्र जोशी, डायरेक्टर, SRAM & MRAM ग्रुप, श्री. नितीन गुप्ता, डायरेक्टर, SRAM & MRAM ग्रुप, डॉ. स्वप्नील कांबळे, डायरेक्टर, SRAM & MRAM ग्रुप आदी उपस्थित होते.

या प्रकल्पाच्या बांधकाम व विकासाची जबाबदारी मॉन्ट वर्ट ग्रुपकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती यूकेस्थित SRAM & MRAM ग्रुपने प्रसिद्धीपत्रकात दिली. SRAM & MRAM ग्रुप, बिग बी कॉर्पोरेशन आणि कझाकिस्तानमधील KAZIND मेडिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा खासगी हेल्थकेअर प्रकल्प साकारण्यात येत आहे.

हा करार बिग बी कॉर्पोरेशनचे संचालक अजय भंडारी आणि SRAM & MRAM ग्रुपचे संचालक महेंद्र जोशी यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाला, असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कझाक सरकारने अस्ताना येथे २४३ हेक्टर आणि अल्माटी येथे १०० हेक्टर भूखंड देण्यास मान्यता दिली होती. या प्रकल्पांतर्गत १०,००० विद्यार्थ्यांसाठीचे वैद्यकीय महाविद्यालय आणि १,००० बेड्सचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे.

या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मॉन्ट वर्ट ग्रुपकडे देण्यात आली आहे. पुण्यातील अत्यंत विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी ओळखला जाणारा मॉन्ट वर्ट ग्रुप आजवर ६.८ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. चेअरमन जयंतीलाल कनारिया आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज कनारिया यांच्याकडे ३० वर्षांचा अनुभव आहे.

SRAM & MRAM ग्रुपचे चेअरमन शैलेश लछू हिरानंदानी म्हणाले, “भारतीय बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रतिक म्हणजे मॉन्ट वर्ट ग्रुप. त्यांचा अनुभव आणि गुणवत्ता हीच या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासाठी त्यांची निवड होण्याचे प्रमुख कारण आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments