Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ईशान खांडेकर याला तिहेरी मुकुट तर स्वरदा...

जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ईशान खांडेकर याला तिहेरी मुकुट तर स्वरदा साने हिचा दुहेरी धमाका तनय इंगवले व शरण्या पटवर्धन यांचीही विजेतेपदावर मोहोर

पुणे दिनांक १५ जून २०२५
ईशान खांडेकर (टॉस अकादमी) याने तीन गटात विजेतेपद पटकाविले तर स्वरदा साने हिने दोन गटात विजेतेपद पटकाविले आणि शारदा सेंटर आयोजित शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत वर्चस्व गाजविले. तनय इंगवले व शरण्या पटवर्धन यांनी अनुक्रमे ११ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात विजेतेपदावर मोहोर उमटवली.

ही स्पर्धा शारदा समूह आणि डेक्कन डाईज व केमिकल्स यांनी पुरस्कृत केली आहे.पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने शारदा सेंटर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत स्पर्धा स्वरदा साने (टॉस अकादमी) हिने अंतिम सामन्यात रुचिता दारवटकर हिच्यावर ११-७,११-७, १२-१०, ११-९ अशी मात केली. तिने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. स्वरदाने याआधी या स्पर्धेतील मुलींच्या सतरा वर्षाखालील गटातही विजेतेपद पटकावले होते.

पुरुषांच्या एकेरीत ईशान याने अंतिम लढतीत एकम क्लबचा अग्रमानांकित खेळाडू अमिष आठवले याच्यावर आश्चर्यकारक विजय मिळवला. अटीतटीने झालेला हा सामना त्याने १०-१२,११-६, ११-६,६-११,६-११,११-७ असा जिंकला. दुहेरीत ईशान खांडेकर व प्रणव घोलकर या जोडीने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी वैभव दहिभाते व शुभंकर रानडे यांचा ९-११,११-९,११-९, ११-६ असा पराभव केला. पहिली गेम गमावल्यानंतर ईशान व प्रणव यांनी अष्टपैलू खेळ करीत उर्वरित तीनही गेम्स घेतल्या आणि विजय मिळविला. ईशान याने त्याआधी १७ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले होते.

मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात तनय इंगवले याने तृतीय मानांकित स्वयम कोठावळे याचा पराभव केला. चौथ्या मानांकित तनय याने हा सामना ११–९, १७-१५,११-८ असा जिंकताना अष्टपैलू खेळ केला.

मुलींच्या अकरा वर्षाखालील गटात मार्तंड बिनीवाले अकादमीची खेळाडू शरण्या पटवर्धन हिने अंतिम सामन्यात अग्रमानांकित खेळाडू अहाना गोडबोले हिचा पराभव करीत अनपेक्षित धक्का दिला हा सामना तिने १-११,११-८,११-९,११-७ असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. तिला दुसरे मानांकन देण्यात आले होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ संघटक राजीव बोडस, स्मिता बोडस आशिष बोडस, अरविंद नातू, उपेंद्र मुळये यांच्या हस्ते झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments