Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत शुक्रवार पेठेतील सेवा...

गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजन : आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहसी गिर्यारोहक उमेश झिरपे व आमदार हेमंत रासने यांची उपस्थिती

पुणे : आयुष्यात ध्येयाचा एवरेस्ट गाठण्यासाठी अभ्याससोबतच साहसी खेळात देखील विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे. देशासाठी, समाजासाठी काही तरी चांगले काम करण्याचा संकल्प करीत विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊल ठेवले. पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन स्वागत यावेळी करण्यात आले. त्यांच्या स्वागताला आंतरराष्ट्रीय पुरस्काराप्राप्त साहसी गिर्यारोहक उमेश झिरपे व आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक १ आणि डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अखिल मंडई मंडळाचे विश्वास भोर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, शिरीष मोहिते, अमर लांडे, विक्रांत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.

उमेश झिरपे म्हणाले, शालेय अभ्यासाला साहसाची जोड दिली पाहिजे. गिर्यारोहणामुळे नेतृत्व गुण आणि संघ भावना निर्माण होते. प्रत्येकाला आयुष्यात एक ‘एव्हरेस्ट’ गाठायचा असतो, परंतु ते साध्य करताना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण केले पाहिजे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, पुण्यात विद्यानिकेतनच्या २० शाळा आहेत. या शाळांमधून अनेक हुशार मुले पुढे आली आहेत. त्यांना मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणीच मोठी स्वप्ने पहा आणि कायम प्रयत्नशील राहा. शाळेतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत नक्की करू, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments