Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांची डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांची डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला

पुणे, ता.९ Feb: केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी अलीकडेच पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राला भेट दिली. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रूग्ण सेवेतील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा आणि प्रगतीची संधी असणाऱ्या संभाव्य क्षेत्रांबाबत बार्ला यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी बार्ला यांनी, विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील विशेषत: कायदेशीर क्षेत्रातील आव्हानांबाबत संस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी ही शिक्षणसंस्था आणि सरकार यांची वचनबद्धता यातून अधोरेखित होते.

या भेटीबद्दल अधिक माहिती देताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉ. यशराज पाटील म्हणाले,“आमच्या संस्थेला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी भेट दिली, हा आमचा सन्मान आहे. उत्कृष्टतेसाठी समर्पित वृत्तीने काम करताना आम्हाला येणारी आव्हाने समजून घेण्याची त्यांनी दर्शविलेली उत्सुकता प्रेरणादायी आहे. अडथळ्यांवर मात करून अपवादात्मक आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रदान करण्याची आमच्या वचनबद्धतेला यामुळे बळ मिळाले आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments