Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized२०४० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू आता टाळता येणार कार्स२४ कडून...

२०४० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू आता टाळता येणार कार्स२४ कडून क्रॅशफ्री इंडिया या स्वयंसेवी संस्थेची उभारणी

गुरुग्राम, भारत – २३ जून २०२५ – भारतात दर मिनिटाला रस्ते अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो. या वाढत्या मृत्यूंबाबत सर्वांना माहिती आहे. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटनांमध्ये माणसे मृत्यूमुखी पडतात त्यापेक्षाही रस्ते अपघातातील मृतांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. हिंसक गुन्हेगारी कृत्ये, दहशतवादी कारवाया किंवा नैसर्गिक आपत्तीच्या तुलनेत रस्ते अपघातात माणसांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. जनमानसांत रस्ते अपघातातील मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबाबत फारसे बोलले जात नसल्याने ही बाब दुर्लक्षित राहिली आहे.

 

देशातील फुल स्टॅक ऑटो-टेक कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कार्स२४ या कंपनीने रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी कार्स२४ कंपनीने क्रॅशफ्री इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था ना नफा या विचारसरणीवर उभारण्यात आली आहे. येत्या २०४० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या शून्यावर आणणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

 

रस्ते अपघातीतील मृत्यू रोखायचे असल्यास या क्षेत्रातील माहिती प्रणाली, रस्त्यांची रचना, संबंधित अधिका-यांच्या स्वभावात बदल घडवण्यावर भर दिला आहे. यासाठी धोरणात्मक सुधारणा घडवण्यासाठी कंपनीच्या अधिका-यांनी आवश्यक कार्यवाही करण्यास सुरुवातही केली आहे. यासाठी प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

 

रस्ते अपघातातील मृत्यू हा यंत्रणेचा दोष, अपघाती मृत्यू हा समज चुकीचा

 

प्रसारमाध्यामांतील नोंदीनुसार, जगभरातील रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू भारतात होतात. जगभरात होणा-या रस्ते अपघतातील मृत्यूपैकी ११ टक्के मृत्यूंची नोंद केवळ भारतात होते. पायाभूत सुविधेची वानवा, रस्ते प्रवासात आवश्यक नियम पाळण्याबाबत चालकाचे दुर्लक्ष, नियमांची अयोग्य अंमलबजावणी तसेच जखमींबाबत असंवेदनशीलता या असंख्य कारणांमुळे रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

 

क्रॅशफ्री इंडिया संस्थेकडून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण टाळण्यासाठी विचारपूर्वक दिर्घकालीन उपाययोजना राबवल्या जातील. या उपाययोजना मोठ्या स्तरावर अंमलात आणल्या जातील. त्यासाठी खालील घटकांवर उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत.

 

● अपघातप्रवण ठिकाणांची नोंद : क्रॅशफ्री इंडिया संस्थेकडून भारतातील सर्वात मोठे रस्ते अपघात माहिती संकलन केंद्राची उभारणी केली जात आहे. अपघातप्रवण ठिकाणांची नकाशावर नोंद करुन धोकादायक क्षेत्रांचा अंदाज वर्तवला जाईल. ही माहिती सामान्य नागरिक आणि सरकारी वापरासाठी उपलब्ध असेल. त्यासाठी संस्थेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांची निर्मिती केली जाईल.

 

 

● धोरणात्मक नव्या योजनांचा समावेश : अपघात टाळता यावेत म्हणून संस्था परिवहन विभागासह संबंधित सर्व विभागांसोबत काम करेल. अपघात होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, सुरक्षा प्रणालींची अंमलबजावणी करणे या आवश्यक कृतींवर भर दिला जाईल. अपघात घडल्यावर दंड आकारणे हा त्यातील एक भाग असेल.

 

 

● शून्य अपघात रस्त्यांची निर्मिती : अपघातप्रवण क्षेत्रात रस्त्यांची पुनर्रचना केली जाईल. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरविकासतज्ज्ञांसोबत संस्था भागीदारीच्या माध्यमातून संबंधित रस्त्यांची पुनर्रचना करेल. या पुनर्रचनेत पूर्वीच्या अभियांत्रिकी चुका टाळल्या जातील.

 

 

 

● माणसांच्या प्रवृत्तीत बदल घडवणे : अपघातप्रवण क्षेत्रात अपघात घडल्यास स्थानिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतीत संस्था मोठ्या स्तरावर जनजागृती मोहिम आयोजित करेल. जखमींबबात तत्काळ मदत पुरवण्याबाबतची प्रसंगावधानता याबाबतीत माहिती दिली जाईल. अपघाताबाबत अपराधीपणाची भावना बाळगू नका, कोणतीही भीती न बाळगता जखमींची तातडीने मदत करा, असा संदेश या मोहिमेद्वारे दिला जाईल.

 

 

 

 

 

● तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर करुन मृत्यू टाळण्यावर भर : हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. दुर्दैवाने अपघात घडल्यास अपघातग्रस्त लोकांकडूनच संबंधित अपघाताबाबतची माहिती मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. अपघाताची माहिती मिळण्यासाठी तसेच संबंधितांना तत्काळ आवश्यक सूचना पुरवत मदतकार्याची माहिती देण्यासाठी एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस या डिजीटल प्रणालीचा वापर केला जाईल. यात डिजीटल साधनांचा वापर केला जाईल. अपघातातामुळे झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी वाहनाची विक्री करण्याचे मार्ग, इतर आवश्यक बाबींसाठी आर्थिक पुरवठा करणे तसेच या आर्थिक व्यवहारात आणि फ्लीट ऑपरेशन्समध्ये सुरक्षा मानांकने तयार करणे इत्यादी अत्यावश्यक कामही संस्थेकडून पार पाडले जाईल.

 

नागरिकांचा सन्मान करणा-या समॅरिटन कायद्याची अंमलबजावणी

क्रॅशफ्री इंडिया ही मोहिम देशातील नागरिकांचा सन्मान करणा-या समॅरिटन कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी आग्रही राहील. हा कायदा अपघातग्रस्तांना मदत करणा-या नागरिकांना संरक्षण देतो. या कायद्याबाबत बरेचजण अनभिज्ञ आहेत. लोकांमध्ये या कायद्याबाबत जनजागृती करण्याबाबत संस्था पुढाकार घेईल. रस्त्यावर अपघात घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत लोकांनी कशी मदत करावी, याबाबत संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत जखमींना मदत करणा-या मदतनीसांचा संस्थेकडून सन्मान केला जाईल. अशा विविध उपक्रमांमुळे अपघातील जखमींना तत्काळ मदत मिळेल, अनेकजण जखमींना मदत करण्यासाठी पुढे सरसावतील, अशी आशा संस्थेने व्यक्त केली.

 

देशासमोरील रस्ते अपघात टाळण्यासाठीच कॅशफ्री संस्थेची उभारणी

कार्स२४ने केवळ कार विक्री व्यवसायात नफा कमावणे या एकमेव उद्दिष्टावर भर दिलेला नाही आहे. चारचाकी वाहन चालवताना कोणाचाही अपघात होऊन मृत्यू होऊ नये, या सामाजिक जाणीवेतून कार्स२४ ने क्रॅशफ्री इंडिया संस्थेची उभारणी केली आहे. क्रॅशफ्री इंडिया हा कार्स२४च्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा प्रमुख भाग आहे. व्यवसायातील आवश्यक विस्तार घटक म्हणून कॅशफ्रीची निर्मिती करण्यात आली आहे. कार खरेदी हे स्वप्न पूर्ण करताना जबाबदारी आणि सुरक्षितताही प्राधन्यतेने पाहायला हवी, अशी भूमिका कार्स२४ने मांडली आहे.

 

कार्स२४चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विक्रम चोप्रा म्हणाले, आमची कंपनी देशात आमची कार खरेदी करणा-या ग्राहकांशी प्रत्येक टप्प्यावर जोडलेली आहे. आम्ही जर कार खरेदी-विक्रीपुरतेच मर्यादित राहिलो, तर आम्ही महत्वाचा मुद्दा गमावत आहोत. क्रॅशफ्री इंडियाची निर्मिती उद्दात्त हेतुखातर झालेली आहे. आपला देश चांगला व्यवसायातून घडावा हा आमचा हेतू आहे. या देशातील आईवडिल आपल्या मुलाला अतिवेगाने दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे किंवा खराब सिग्नलयंत्रणेमुळे गमावणार नाहीत. कदाचित शून्य अपघातांचे लक्ष्य पूर्ण करण्यास अपयश येईल. परंतु त्या दिशेने वाटचाल कायम राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले.

 

रस्ते सुरक्षाततज्ज्ञांकडून मोहिमेची उभारणी

क्रॅशफ्री इंडिया ही मोहिम व्हिजन झिरो ट्रस्टकडून यशस्वीरित्या राबवली जात आहे. या मोहिमेला रस्ते सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ अमर श्रीवास्तव आणि दिपांशू गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे दोघेही भारतीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे (आयआरएससी) सहसंस्थापक आहेत. आयआरएससी ही भारतातील तरुण नेतृत्वाखालील सर्वात मोठी रस्ते सुरक्षा उपलब्ध करुन देणारी महत्त्वाची चळवळ मानली जाते. धोरणनिर्मिती आणि जनजागृतीच्या क्षेत्रात या दोघांचाही दांडगा अनुभव आहे. दोघांनीही अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची गुणवत्ता, संबंधित विषयाशी निगडीत कायद्याची अंमलबजावणी आणि लोकांच्या वर्तनामधील समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी योगदान दिले आहे. थातुरमातुर उपायांऐवजी दीर्घकालीन प्रभावशाली उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हेच कॅशफ्री संस्थेचे उद्दिष्ट आहे.

 

सहकार्यासाठी खुले आवाहन

क्रॅशफ्री इंडिया संस्थेने आपले कार्य विस्तारण्यासाठी सर्व घटकांसोबत भागीदारी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रस्ते सुरक्षा ही राष्ट्रीय गरज असून, या समस्येचे प्राधान्याने निराकरणे केले जावे ही विचारधारणा असलेल्या सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, स्टार्टअप्स, थिंक टॅंक्स, शहरी विकास तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिकांना भागीदारीसह काम करण्याचे संस्थेने आवाहन केले आहे.

 

भागीदारीसाठी किंवा योगदानासाठी तसेच अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती देण्यासाठी इच्छुकांनी

 

www.crashfreeindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments