Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedहर्बलाइफ इंडियाकडून व्रिटीलाइफ आयुर्वेदिक स्किन केअर श्रेणीसाठी ब्रँड अँबेसेडर्स म्हणून स्मृती मंधाना...

हर्बलाइफ इंडियाकडून व्रिटीलाइफ आयुर्वेदिक स्किन केअर श्रेणीसाठी ब्रँड अँबेसेडर्स म्हणून स्मृती मंधाना आणि मनिका बत्रा यांची घोषणा

पुणे, २६ जून २०२५: हर्बलाइफ इंडिया या प्रमुख आरोग्य व वेलनेस कंपनी, समुदाय व प्लॅटफॉर्मने आपल्या व्रिटीलाइफ आयुर्वेदिक स्किन केअर श्रेणीसाठी भारतातील दोन स्पोर्ट्स आयकॉन्स भारतीय क्रिकेटर स्मृती मंधाना आणि भारतीय टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांच्या सोबतच्या सहयोगाची घोषणा केली आहे. या धोरणात्मक सहयोगाचा वैद्यकीयदृष्‍ट्या चाचणी केलेल्या स्किनकेअर रूटिनच्या माध्यमातून स्वास्थ संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्याचा मनसुबा आहे. या सहयोगामधून व्यक्तीचे सर्वांगीण आरोग्य उत्तम ठेवण्याला साह्य करण्याप्रती हर्बलाइफची कटिबद्धता दिसून येते.

 

उच्चस्तरीयशारीरिक व वातावरणीय तणावाचा सामना करणाऱ्या ऍथलीट्स स्मृती मंधाना आणि मनिका बत्रा यांना सर्वोत्तम स्किनकेअरचे महत्त्व माहित आहे, जे दर्जा किंवा प्रामाणिकपणाबाबत तडजोड न करता त्यांच्या सक्रिय जीवनशैलीला साह्य करते. या सहयोगामधून त्वचेची काळजी घेण्यासंदर्भात समान दृष्टिकोन दिसून येतो, जेथे आयुर्वेदिक परंपरा आणि आधुनिक विज्ञानाचे संयोजन आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आत्मविश्वासाने स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यास सक्षम होते.

 

हर्बलाइफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजय खन्ना म्हणाले, “व्रिटीलाइफमधून पोषण व सर्वोत्तम स्किनकेअरप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जे आयुर्वेदाच्या तत्त्वांमध्ये सामावलेले आहे आणि त्याला विज्ञानाचे पाठबळ आहे. ही श्रेणी विस्तारित करत असताना आम्हालाआनंद होत आहे की, हर्बलाइफचे बहुमूल्य अँबेसेडर्स स्मृती मंधाना आणि मनिका बत्रा व्रिटीलाइफ स्किनकेअर श्रेणीला पुढे नेण्यासाठी त्यांचा सहयोग वाढवत आहेत. त्यांच्यामध्ये संतुलन, ताकद आणि प्रामाणिकपणाचा उत्साह दिसून येतो. ही मूल्ये व्रिटीलाइफसाठी महत्त्वाची आहेत. त्यांचा प्रेरणादायी प्रवास आम्हाला अधिकाधिक व्यक्तींना सर्वांगीण आरोग्याचे सक्षम पैलू म्हणून त्वचेची काळजी घेण्यास प्रेरित करण्यासाठी मदत करेल.”

 

व्रिटीलाइफच्या आयुर्वेदिक स्किनकेअर श्रेणीमध्ये सध्या फेशियल क्लिन्सर , फेशियल टोनर, फेशियल सीरम आणि मॉइश्‍चरायझरचा समावेश आहे. ही स्किनकेअर श्रेणी कडुलिंब, हळद, कोरफड व कुमकुमादी ऑइल यांसारख्या वनस्पतीजन्य घटकांच्या वापरासाठी वेगळी आहे. या घटकांमध्ये डर्माटोलॉजिकली चाचणी केलेले, पॅराबेन-मुक्त, सल्फेट-मुक्त आणि हायपोअॅलर्जेनिक अॅक्टिव्‍ह्जचा समावेश असतो. प्रत्येक फॉर्म्युलेशन प्रभावीपणा देण्यासाठी तयार केले आहे, कठोर क्लिनिकल प्रमाणीकरण आणि हर्बलाइफच्या जागतिक गुणवत्ता मानकांद्वारे समर्थित आहे. बेंगळुरूमधील हर्बालाइफच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे विकसित केलेली ही उत्पादने भारतीयांसाठी मेड इन इंडिया आहेत आणि विशेषतः भारतीयांच्या त्वचेच्या प्रकारांना अनुकूल आहेत.

 

भारतीय क्रिकेटर स्मृती मंधाना म्‍हणाल्‍या, “मला व्रिटीलाइफ परिवारामध्ये त्यांची ब्रँड अॅम्‍बेसेडर म्हणून सामील होण्‍याचा आनंद होत आहे. अॅथलीट असल्याने सतत धावपळीमध्ये माझ्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे आणि व्रिटीलाइफचे आयुर्वेदिक-आधारित फॉर्म्युलेशन्स माझ्या जीवनशैलीशी संलग्न आहेत. माझा आरोग्‍य उत्तम ठेवण्यावर विश्वास आहे आणि व्रिटीलाइफमधून ही तत्त्वे परिपूर्णपणे दिसून येतात.”

 

भारतीय टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा म्हणाल्या,“खेळामध्ये व जीवनात शिस्तबद्धता आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्रिटीलाइफसह मला स्किनकेअर मिळाले आहे, जे परंपरेमध्ये सामावलेले असण्या सोबत आधुनिक देखील आहे. मला ब्रँडचे प्रतिनिधीत्व करण्याचा आणि आपल्या देशातील विविध सौंदर्य परंपरांना साजरे करण्याचा आनंद होत आहे.”

 

गेल्‍या २५ वर्षांपासून हर्बलाइफ इंडियाने देशभरात आरोग्य व स्वाथ्य याला चालना देण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. स्थापने पासून ब्रँड आपल्या वैज्ञानिकदृष्‍ट्या पाठबळ असलेल्या पोषण व पर्सनल केअर उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्तींना सक्रिय जीवन जगण्यास सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. वर्षानुवर्षे हर्बलाइफ विश्वसनीय ब्रँड ठरत आहे, हजारो स्वावलंबी वितरकांना पाठिंबा देत आहे आणि समुदायाला फिटनेस व सर्वांगीण आरोग्याप्रती प्रेरित करत आहे. दर्जा, नाविन्यता आणि ग्राहक-केंद्रित सोल्‍यूशनवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करत हर्बलाइफ सकारात्‍मक जीवनशैली परिवर्तनाला चालना देत आहे, ज्‍यामुळे भारतातील वेलनेस उद्योगामधील लीडर म्हणून ब्रँडचा वारसा अधिक दृढ होत आ

हे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments