Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईने अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञान आणून कर्करोगाच्या उपचारांमध्ये अचूकता...

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईने अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञान आणून कर्करोगाच्या उपचारांमध्ये अचूकता वाढवली

रेडिक्सअ‍ॅक्ट आणून या हॉस्पिटलने कॅन्सर उपचारांमध्ये एक जागतिक मापदंड स्थापित केला आहे, रुग्णांना प्रदान केल्या जाणाऱ्या अनुभवात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे ~

 

मुंबई, 1 जुलै 2025: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईने प्रगत रेडिक्सअ‍ॅक्ट उपचार वितरण प्रणालीसह रेडिएशन थेरपी अपग्रेड करून आपल्या कॅन्सर उपचार क्षमतांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आणून हॉस्पिटलने ऑन्कोलॉजीमध्ये आपले नेतृत्व अधिक मजबूत केले आहे, कॅन्सरवरील उपचारांमध्ये अधिक जास्त अचूकता, सुरक्षितता आणि अनुकूलता आणते, रुग्णांना मिळणाऱ्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणते.

 

रेडिक्सअ‍ॅक्ट कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या व्यापक कॅन्सर देखभाल सुविधांना बळकटी देते. ही प्रणाली पुढील पिढीच्या पायाभूत सुविधा, अवयव-विशिष्ट सब-स्पेशालिटी आणि जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेल्या प्रोटोकॉलचा एक शक्तिशाली मिलाप आहे.

 

रेडिक्सअ‍ॅक्ट सिस्टम ही रेडिएशन थेरपीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. निरोगी ऊतींच्या कमीत कमी नुकसानासह अचूक उपचार देण्याची क्षमता त्यात आहे. बिल्ट-इन स्कॅनरने सुसज्ज, ही प्रणाली संपूर्ण उपचारादरम्यान ट्यूमर योग्य स्थितीत आहे याची खात्री करण्यासाठी रिअल-टाइम इमेजिंग देते. ही प्रणाली बहुमुखी आहे, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करण्यात सक्षम आहे. रेडिक्सअ‍ॅक्ट सुरक्षित आहे, उपचार कार्यक्षमता वाढवते. याचे सिंक्रोनी तंत्रज्ञान शरीराच्या हालचालींशी जुळवून घेऊन अचूकता राखते, अगदी श्वासोच्छवासाशी देखील जुळवून घेते. हा दृष्टिकोन रुग्णांना सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम उपचार अनुभव प्रदान करतो.

 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये रेडिक्सअ‍ॅक्टला पूरक अशी, भारतातील एक सर्वात मोठी, प्रिसिजन ऑन्कोलॉजी टेक्नॉलॉजी असेम्ब्ली आहे. याठिकाणी ३०० हून अधिक अनुभवी आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध मल्टीडिसिप्लिनरी कॅन्सर तज्ञांची टीम नियुक्त केलेली आहे. हे हॉस्पिटल जीनोमिक ऑन्कोलॉजीमध्ये देखील अग्रणी आहे. अत्याधुनिक मॉलिक्युलर आणि जीनोमिक्स प्रयोगशाळेने सुसज्ज आहे ज्यामध्ये ५००-जीन सोमॅटिक कर्करोग पॅनेल आहे, उपचार प्रोटोकॉल प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केले जातात. माहितीवर आधारित दृष्टिकोन सुधारित निदान, लक्ष्यित उपचार आणि सुधारित क्लिनिकल परिणामांकडे नेतो. ही एकात्मिक इकोसिस्टम प्रत्येक रुग्णाला प्रगत तंत्रज्ञान, सब-स्पेशालिटी कौशल्ये आणि डेटावर आधारित, व्यक्तिगत देखभालीचा फायदा मिळेल याची खात्री देते.

 

रेडिक्सअ‍ॅक्ट सिस्टीममध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या ऍनाटॉमी किंवा ट्यूमरच्या हालचालीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, ज्यामुळे अगदी श्वास घेतानादेखील ट्यूमरला अधिक अचूकतेने लक्ष्य केले जाऊ शकते. ही प्रगत वैशिष्ट्ये क्लिनिशियनना अधिक अचूकता आणि कार्यक्षमतेने अधिक व्यक्तिगत देखभाल प्रदान करण्यास मदत करतात.

 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि सीईओ डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, “कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या रुग्णांना सर्वात प्रगत आणि कार्यक्षम उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय नवोपक्रमाच्या सीमा सतत रुंदावत असतो. जागतिक स्तरावर प्रशंसा लाभलेली रेडिक्सअ‍ॅक्ट सिस्टीम आणून आम्ही कॅन्सर रुग्णांना जागतिक दर्जाची देखभाल प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेत एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. ऑन्कोलॉजीमध्ये आघाडीचे म्हणून ओळखले जाणारे सेंटर म्हणून, आम्हाला भारतात सर्वात अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञान आणल्याचा अभिमान आहे. हे अपग्रेड क्लिनिकल परिणाम आणि काळजीची गुणवत्ता सुधारणारी जागतिक मानके साध्य करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.”

 

भारतात कॅन्सरचा धोका सातत्याने वाढतच आहे. रेडिक्सअ‍ॅक्ट सिस्टीम आणणे ही केवळ तांत्रिक सुधारणा नाही तर ती भारतात कॅन्सरच्या देखभालीच्या भविष्याकडे एक पाऊल आहे, ज्यामुळे उपचारांचा दर्जा वाढून रुग्णांचे जीवन बदलते. भारतातील आघाडीच्या कॅन्सर देखभाल संस्थांपैकी एक म्हणून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल प्रगत, रुग्ण-केंद्रित ऑन्कोलॉजी उपचार, देखभाल प्रदान करण्यात आघाडीवर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments