Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized'मदर्स रेसिपी'ने परंपरा व आधुनिक जीवनशैलीची सांगड घालत लाँच केला 'हार्टी रूट्स'

‘मदर्स रेसिपी’ने परंपरा व आधुनिक जीवनशैलीची सांगड घालत लाँच केला ‘हार्टी रूट्स’

पुणे, 01 जुलै 2025 : पारंपरिक चव आणि घरगुती विश्वसनीयतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘मदर्स रेसिपी’ या भारतीय ब्रँडने ‘हार्टी रूट्स’ या त्यांच्या नव्या आणि नावीन्यपूर्ण ब्रँडच्या लाँचची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या निमित्ताने हार्टी रूट्सने पारंपरिक, पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या चवींची आजच्या आरोग्यप्रेमी आणि जागरूक आणि चोखंदळ ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी सांगड घातली आहे.

‘हार्टी रूट्स’ हा ‘मदर्स रेसिपी’चा तळमळीने राबविलेला उपक्रम असून संचालिका श्रीमती संजना देसाई यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारण्यात आला आहे. त्यांची वैयक्तिक बांधिलकी आणि तळमळ यांचा परिपाक असलेल्या या नव्या उत्पादन मालिकेत पारंपरिक पाककृतींचा गाभा जपून, त्यात पोषणमूल्ये मुबलक असलेल्या सुपरफूड्सची भर घातलेली आहे. विशेषतः आरोग्याबाबत जागरूक असलेले मिलेनियल्स आणि संतुलित जीवनशैली राखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘हार्टी रूट्स’मधून पारंपरिक चव कायम ठेवत गिल्ट-फ्री होऊन आस्वाद घेता येईल असा खाद्यानुभव ग्राहकांना मिळतो.

ग्राहक संशोधनातून तरुण ग्राहकांमध्ये, विशेषतः मिलेनिअल्समध्ये झालेले परिवर्तन दिसून येते. त्यांचा आरोग्यदायी पदार्थांकडे अधिक ओढा आहे. मिलेनिअल्स चवीच्या आणि आरोग्याच्या बाबतीत चोखंदळ असतात. तसेच त्यांना पोषणमूल्य व अस्सल चव देणारी उत्पादने हवी असतात. त्याचप्रमाणे रक्तदाब, मधुमेह इत्यादी आरोग्य समस्या असलेल्या पूर्वीच्या पिढीतील ग्राहकांना डाएटशी जुळणारे पदार्थांचे पर्याय हवे असतात. हार्टी रूट्स याच ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करतो.

हार्टी रूट्सच्या श्रेणीमध्ये खास तयार केलेले लोणच्यांचे पर्याय उपलब्ध आहेत :

अश्वगंधा युक्त कैरीचे लोणचे : या लोणच्यात कच्च्या कैरीची चमचमीत चव आणि अश्वगंधाच्या सौम्य गुणधर्मांची सांगड घातली आहे. अश्वगंधा हे एक ॲडाप्टोजेन असून तणाव, सूज आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते.

शेवग्याच्या पानांसह लसूण लोणचे : तिखटसर लसूण आणि पोषणमूल्यांनी भरलेल्या शेवग्याच्या पानांचा मिलाफ असलेले हे लोणचे पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती, हाडांची मजबुती आणि पचनतंत्राच्या आरोग्यास मदत करते.

अळशीच्या बियांसह कैरीचे लोणचे : आंबटगोड कैरी आणि खमंग अळशीबिया यांचे मिश्रण असलेले हे लोणचे हृदयाच्या आरोग्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रणास आणि रक्तातील साखर संतुलनास मदत करते.

100% पाम गुळासह लिंबाचे लोणचे : आंबटसर लिंबू आणि नैसर्गिक पाम गुळाचा संगम असलेले हे लोणचे आवश्यक क्षारांनी समृद्ध आहे. ते पचनास मदत करते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर शुद्ध ठेवते.

वांग्याचे लोणचे : वांग्याची सौम्य गोडसर आणि मातकट चव जपणारे हे लोणचे अँटिऑक्सिडंट्स, आहारातील फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे.

कारल्याचे लोणचे : वैशिष्ट्यपूर्ण कडूपणा आणि मसाल्यांचा समतोल असलेले हे लोणचे रक्तातील साखर नियंत्रणास मदत करते आणि जीवनसत्त्व अ व क पुरवते.

भारतात सध्या अंदाजे दर वर्षी 10% दराने वाढत असलेल्या रु. 10,352 कोटींची उलाढाल असलेल्या हेल्थ अँड वेलनेस अन्नपदार्थ उत्पादनांच्या मार्केटशी ‘हार्टी रूट्स’ अगदी अचूकपणे सुसंगत आहे. विशिष्ट ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचण्यासाठी या श्रेणीसाठी मदर्स रेसिपीची सखोल ग्राहक समज आणि बी2सी मार्केटिंग स्ट्रॅटजीजचा उपयोग करण्यात आला आहे. पारंपरिक चव राखून आणि पॉवर-पॅक्ड सुपरफूड्स सादर करत प्रत्येक घास पोषक व चविष्ट असेल याची खातरजमा हार्टी रूट्सने केली आहे.

या महत्त्वपूर्ण लाँचबाबत आपला उत्साह व्यक्त करत मदर्स रेसिपीच्या कार्यकारी संचालिका श्रीमती संजना देसाई म्हणाल्या, “‘हार्टी रूट्स’च्या माध्यमातून आपण पारंपरिक पाककृतींचा वारसा आणि आजच्या पोषणविषयक गरजांमधील दरी आम्ही भरून काढत आहोत. या नव्या ब्रँडच्या माध्यमातून परंपरेच्या चौकटीत राहून नावीन्य साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोणच्यांच्या मालिकेसह सुरुवात करत आम्ही लवकरच अशाच प्रकारची इतर उत्पादनेही सादर करणार आहोत. भारतीय खाद्यसंस्कृतीतील पारंपरिक चवींचा मूळ गाभा टिकवून ठेवत, त्यात विचारपूर्वक पोषणमूल्यांनी युक्त घटकांची भर घालून आजच्या आरोग्यविषयक उद्दिष्टांना पूरक बनवणे, ही आमची सततची बांधिलकी या उपक्रमातून दिसून येते. ‘हार्टी रूट्स’ हे चव आणि सजग आरोग्यनिष्ठ जीवनशैली यामधील एक नवा मानदंड ठरेल, अशी आमची खात्री आहे. एक असा अनुभव जो चविष्ट, पौष्टिक आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडलेला आहे.”

‘हार्टी रूट्स’ हे पर्यावरणस्नेही पद्धतीने पॅक केलेले असून देशभरातील प्रमुख सुपरमार्केट्स, विशेष खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहजपणे उपलब्ध आहे, जेणेकरून आरोग्याबाबत जागरूक असलेल्या सर्व ग्राहकांना हे सहज उपलब्ध होऊ शकेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments