Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राहक अनुभवात कायापालट घडवून आणणारा निसानचा नवोन्मेषकारी ‘निसान वन’ प्लॅटफॉर्म

ग्राहक अनुभवात कायापालट घडवून आणणारा निसानचा नवोन्मेषकारी ‘निसान वन’ प्लॅटफॉर्म

● निसान वन हा सिंगल डिजिटल साइन-ऑन प्लॅटफॉर्म असून, ग्राहकाच्या संपूर्ण प्रवासात आवश्यक असलेल्या सेवांच्या विनंत्या ह्या प्लॅटफॉर्मद्वारे केल्या जाऊ शकतात

● नवीन व पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या ग्राहकांना, त्यांच्या गरजांची सर्वोत्तम रितीने पूर्तता करणारे कस्टमायझेशन देऊ करणारे, वन स्टॉप सोल्युशन

● पूर्वीपासूनच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुजिव लाभांसह नवीन ‘रेफर अँड अर्न’ योजना लागू

● ‘निसान वन’ १००,०००व्या मॅग्नाइटच्या देशांतर्गत बाजारपेठेतील प्रेषणाचा लाभ घेणार, रूपांतरणाच्या प्रवासातील नवीन टप्प्याला सुरुवात

गुरूग्राम, १२ फेब्रुवारी २०२४: निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एनएमआयपीएल) आपल्या २०२४ सालातील ग्राहककेंद्री उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘निसान वन’ हा निसान वेब प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. मॅग्नाइटने १००,००० ग्राहकांचा टप्पा ओलांडल्याचा टप्पा साजरा करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. निसान वन हा एक नवोन्मेषकारी सिंगल साइन-ऑन वेब प्लॅटफॉर्म आहे. गाडीच्या प्रारंभिक चौकशीपासून ते टेस्ट ड्राइव्ह बुक करणे, कारची निवड, बुकिंग आणि सर्व्हिंसिंगपर्यंत ग्राहकाच्या संपूर्ण प्रवासात हा प्लॅटफॉर्म अखंडितपणे सेवा विनंत्या करण्याची मुभा ग्राहकांना देतो.

हा आद्य आणि अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म असून, भारतातील वाहन उद्योगातील एका लक्षणीय टप्प्याची सुरुवात आहे. एकेरी, वापरकर्त्याला पूरक आणि नेव्हिगेशनसाठी सोप्या अनुभवाद्वारे निसान वनने ग्राहकांचे अनेकविध स्पर्शबिंदू (टचपॉइंट्स) एकत्र आणले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. निसानने भारतात हाती घेतलेल्या सातत्यपूर्ण रूपांतरण व व्यवसायाला वेग देण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. ह्याच योजनेचा भाग म्हणून अलीकडील काळात नवीन मॅग्नाइटचे अनेक प्रकार बाजारात आणले गेले, जाळ्याचा विस्तार करण्यात आला, तसेच नेतृत्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या.

निसान मोटर इंडियाच्या मार्केटिंग, उत्पादन व ग्राहक अनुभव विभागाचे संचालक मोहन विल्सन म्हणाले: “ह्या महिन्यात आमच्या ग्राहकांच्या १००,००० मॅग्नाइट गाथा साजऱ्या करत असतानाच, निसान वन हा प्लॅटफॉर्मही सर्वांपुढे आणताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. ग्राहक आमच्या ब्रॅण्डचा अनुभव ज्या पद्धतीने घेतात, ती पद्धत आमूलाग्रपणे बदलून टाकणे हा ह्या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. हा दमदार, नवोन्मेषकारी प्लॅटफॉर्म म्हणजे निसानच्या ‘ग्राहककेंद्री’ तत्त्वाचेच प्रतिबिंब आहे. हा प्लॅटफॉर्म माहिती आणि संभाव्य व पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अशा सर्व ग्राहकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणारे कस्टमायझेशन देऊ करतो. रेफर अँड अर्न कार्यक्रम उद्योगक्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. आमच्या ग्राहकांना बक्षीस देण्याचा आणि त्यांनी निसानवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा ब्रॅण्डचा एक मार्ग आहे.”

निसान वन ग्राहकाचा प्रवास कार्यक्षम व अखंडित करण्यात मदत करतो. त्यामुळे ग्राहकाला अधिक चांगला अनुभव मिळतो. निसान वनमुळे, आता पूर्वीपासूनच्या आणि संभाव्य अशा ग्राहकांना त्यांचा कंपनीसोबतचा प्रवास हाताळण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्स व प्लॅटफॉर्म्स वापरण्याची गरज उरलेली नाही. हा प्लॅटफॉर्म ग्राहकाने निवडलेल्या प्राधान्यक्रमांच्या आधारे लक्ष्यीकृत संवादाचीही मुभा देतो. उदाहरणार्थ, ग्राहक त्यांच्या निसान वाहनासाठी सर्व्हिसिंगच्या स्मरणांशी निगडित संवाद प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतात. निसान वनद्वारे निसान मोटर इंडियामध्ये प्रथमच रिअल-टाइम सेवा आरक्षणाची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक प्रवासाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकते. ह्यामध्ये ग्राहकांना सर्व्हिसिंगबद्दल स्मरण करून देण्याचाही समावेश होतो.

अलीकडेच निसान मोटर इंडियाने १००,००० मॅग्नाइट गाड्या चेन्नईतील अलायन्स प्लाण्टमधून (आरएमएआयपीएल) भारतातील बाजारपेठांमध्ये यशस्वीरित्या पाठवून, एक मोठा टप्पा ओलांडला. ग्राहकांच्या अपेक्षेहून चांगली कामगिरी करणाऱ्या उच्च दर्जाच्या उत्पादन व सेवा देण्याप्रती तसेच एक मोठे वाहनउत्पादन केंद्र म्हणून भारताची संभाव्यता जोखण्याप्रती ब्रॅण्डची बांधिलकी ह्या यशातून दिसून येते.

निसानने ‘निसान वन’चा भाग म्हणून ‘रेफर अँड अर्न’ कार्यक्रमही सुरू केला आहे. पूर्वीपासूनच्या निसान ग्राहकांना अनेकविध एक्सक्लुजिव लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. नवीन ‘रेफर अँड अर्न’ कार्यक्रमाचा लाभ घेऊन पूर्वीपासूनचे ग्राहक त्यांच्या मित्रमंडळींना तसेच कुटुंबियांना निसान कार खरेदी करण्यासाठी रेफर करू शकतात आणि मोबदल्यात पॉइंट्स कमावू शकतात. हे पॉइंट्स अनेकविध सेवा व लाभ घेण्यासाठी रिडीम करता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments