Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतीतील नफा वाढवण्यास कटिबद्ध असलेल्या कॅन बायोसिसने इम्पोर्टेड स्पेशालिटी खते व नीम...

शेतीतील नफा वाढवण्यास कटिबद्ध असलेल्या कॅन बायोसिसने इम्पोर्टेड स्पेशालिटी खते व नीम कीटकनाशकांचे केले लोकार्पण!

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानात जागतिक ख्याती प्राप्त भारतीय कंपनी कॅन बायोसिसच्या इम्पोर्टेड वॉटर सोल्युबल रोफा तसेच नीम प्रणालीतील विविध १५ उत्पादनांचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात नोवोटेल हॉटेल, पुणे येथे लोकार्पण करण्यात आले. सरस्वती वंदन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यामुळे विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडून आले. तसेच कंपनीचा चेहरा असलेल्या बायोजीत या मॅस्कॉटने विविध पिकांच्या वेशात आलेल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन शाश्वत शेती, मातीचे स्वास्थ्य व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख उद्याच्या भविष्याला करून दिली. याप्रसंगी बोलतांना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालीका संदीपा कानिटकर म्हणाल्या, “आर म्हणजे रोफा आणि रोफा म्हणजे रिअल ऑप्टिमाईज्ड फर्टिलायझर अप्लिकेशन असलं तरी, माझ्यासाठी आर म्हणजे शेतकऱ्यांचा रिस्पेक्ट (आदर) आहे.” रोफा हे फ्रान्स मधील तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देण्यासाठी कॅन बायोसिसने डी सँगोज कंपनी सोबत करार केला असून या श्रेणीतील १२ उत्पादने पूर्णतः पाण्यात विरघळणारी, सर्व फळबागा व भाजीपाला पिकांसाठी कुठल्याही हवामानात प्रभावी आहेत. कॅन बायोसिसच्या कृषी तंत्रज्ञानातील गेल्या २ दशकांच्या अनुभवातून तज्ज्ञांनी प्रत्यक्ष वापरातून तपासलेली रोफाची उत्पादने खात्रीशीर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतात.

 

यासोबतच कॅन बायोसिसने पूर्वजांचे तंत्रज्ञान अधिक संशोधित करून भारताचा अभिमान उंचावत नीम श्रेणीत देखील विविध ३ उत्पादनांचे लोकार्पण पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपरे, ॲग्रोवनचे संपादक व संचालक श्री. आदिनाथ चव्हाण, फार्म डीएसएस ॲग्रीटेक प्रा. लि. चे संस्थापक, व्यवस्थापक तथा ट्रेनर व कन्सलटंट डाळिंबरत्न, श्री. बाबासाहेब गोरे, आयसीएआर – एनआरसी ग्रेप्स पुण्याचे प्रिंसिपल सायंटीस्ट (प्लांट पॅथॉलॉजी) डॉ. सुजॉय साहा, डी सँगोजचे मुख्य समुह माहिती अधिकारी श्री. जेफ फ्रान्को, बसाई चे व्यवस्थापक तथा संरक्षण फाउंडेशनचे संचालक श्री. विपिन सैनी, इंडोफिल इंड्रस्ट्रीज लि.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरेंद्र राणे, प्रगतिशील शेतकरी श्री. गणेश नानोटे, क्रांतिकारी शेतकरी श्री. कृषीभुषण संजीव माने, दाभोळकर परिवाराचे अध्यक्ष श्री. वासुदेव काथे, कॅन बायोसिसचे डिलर श्री. राजेश चावला, श्री. अमोल गायकवाड, कॅन बायोसिसचे टेक्निकल ॲडव्हाईजर श्री. एस. एस. नाकट आणि कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालीका तथा बसाई अध्यक्षा संदीपा कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. नीम श्रेणीतील सर्व गुणवत्तापूर्ण उत्पादने विषमुक्त कृषी क्षेत्रात क्रांती आणणारी आहेत. त्यामुळे कॅन बायोसिसने आता जगाला शाश्वत शेतीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध करून दिला असल्याची भावना मंचावरील उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केली. कार्यक्रमावेळी कॅन बायोसिस कंपनीचे विविध राज्यांतील डिलर्स, पदाधिकारी, कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

परिसंवादातील तज्ज्ञांची मते :

 

पद्मश्री, बिजमाता राहीबाई पोपरे “मी अडाणी बाई, पण मला इतकं कळतं की, मातीला जपलं तर माती तुम्हाला जगवते. म्हणून विषमुक्त शेतीसाठी सारे एकत्र येऊन काम करत राहायला पाहिजे. कॅन बायोसिसचे हे उत्पादन आधुनिक शेती करायला खरचं उपयुक्त आहेत.”

 

डाळिंबरत्न, श्री. बाबासाहेब टी. गोरे,”रोफा सिरीजची मधील हे तंत्रज्ञान फवारणीद्वारे अन्नद्रव्यांच्या अचूक व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत”

 

श्री. आदिनाथ चव्हाण “ज्या पद्धतीने कॅन बायोसिस विज्ञान निष्ठेने शेतीसाठी काम करते त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली तर भारताची प्रगती खूप लांब नाही असं मला वाटतं. शेती हे विज्ञान आहे आणि शेती हा व्यवसाय आहे हेच आम्ही शेतकऱ्यांपर्यंत ॲग्रोवन पोहचवण्याचा प्रयत्न करतो.”

 

डॉ. सुजॉय साहा “एनआरसी ग्रेप्स कडे अनेक मायक्रोब्स आहेत. मायक्रोब्स कोणते घ्यायचे? ही चर्चा जेव्हाही होते तेव्हा मला सर्वात आधी कॅन बायोसिसचे नाव ऐकायला मिळते. मी सुद्धा नेहमी म्हणतो या कंपनीच्या प्रोडक्टस जगाने मान्य केले आहेत. तेव्हा ते भारतीय शेतकऱ्यांनी नक्कीच वापरायला हवेत.”

 

 

 

आधुनिक शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान म्हणजे कॅन बायोसिस

 

कॅन बायोसिस प्रा. लि. ही पुणे स्थित कंपनी शेतीसाठी गेल्या दोन दशकांपासून जैव तंत्रज्ञान आधारित नवं संकल्पना विकसित करणारी अग्रगण्य संस्था आहे. २० वर्षांहून अधिक काळ संशोधनात कार्यरत असलेली ही कंपनी जमिनीचे स्वास्थ्य, कीड नियंत्रण व पोषण व्यवस्थापनासाठी सुक्ष्मजीवांवर आधारित उत्पादने निर्माण करते. डीएसआयआर मान्यता प्राप्त रिसर्च व डेव्हलपमेंट विभागाद्वारे पेटंट केलेले लिक्विड फर्टिलायझर व स्मार्ट प्लॅटफॉर्मद्वारे शाश्वत शेतीसाठी अभिनव उपाय देण्यासाठी कंपनी सदैव तत्पर असते. ‘स्पीड कंपोस्ट’ तंत्रज्ञानामुळे स्ट्रबल बर्निंग कमी होऊन मातीतील सेंद्रिय कार्बन वाढतो. कंपनीने डब्ल्यूआयपीओ, एनआरडीसी, इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स सारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळवले आहेत. भारतासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्येही कंपनीने आपली उत्पादने पोहोचवत जागतिक कृषी बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्त्पन्न वाढीसह शेतकऱ्यांना शेतीचा पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध करून देणे हेच कॅन बायोसिसचे ध्येय आहे. त्यामुळेच आज भारतातील शेतकरी शाश्वत शेतीकडे वाटचाल करणारा विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून कॅन बायोसिस

कडे आशेने पाहतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments