पुणे- पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी नूतन अध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणीला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी नूतन अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश हल्ले, खजिनदार दिलीप तायडे व इतर सदस्य उपस्थित होते. पुणे शहरातील विविध समस्या निवारणासाठी नूतन कार्यकारिणी सक्रिय राहील अशी अपेक्षा व्यक्त करून संघाच्या सामाजिक व लोकहिताच्या उपक्रमास आपली सक्रिय साथ राहील अशी ग्वाही मोहोळ आणि खर्डेकर यांनी दिली.


