रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चा रोटरी वर्ष 2025 -26 चा पदग्रहण समारंभ दोन जुलै रोजी गांधी भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. क्लबचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे .
या समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे 2025- 26 चे प्रांतपाल रो. संतोष मराठे, सह प्रांतपाल रो. वैशाली वेर्णेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
यावेळी रो. अश्विनी शिलेदार यांनी मावळते अध्यक्ष रो.डॉ.मीनल धोत्रे यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तर
रो.श्यामल मराठे यांनी रो. शशांक टिळक यांच्याकडून सचिव पदाची सूत्रे स्वीकारली .
या समारंभात क्लबच्या पुढील वर्षाच्या कार्याची रूपरेषा आणि विविध सामाजिक उपक्रमांची तसेच प्रकल्पांची माहिती देण्यात आली .
कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट मधील पदाधिकारी , क्लब चे सदस्य, पदाधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.पद्मजा जोशी यांनी केले


