Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाळ मृदुंगाच्या बरोबरच ‘येरे गड्या मैदानात’ असा आवाज वाखरीतच घुमतो माजी...

टाळ मृदुंगाच्या बरोबरच ‘येरे गड्या मैदानात’ असा आवाज वाखरीतच घुमतो माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे विचारः श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे उद्घाटन

णे, ४ जुलै : ” वारकरी सांप्रदायाच्या ठिकाणी टाळ मृदुंगाचा आवाज, तर मांडीवर थाप मारून येरे गड्या मैदानात असा आवाज वाखरीमध्ये घुमतो. हे केवळ डॉ. विश्वनाथ दा. कराडच करू शकतात. त्यांनी पंढरपुरच्या मातीत भक्ती-शक्तीचा संगम दाखविणारी नवी पिढी उभी केली आहे.” असे विचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने वाखरी येथील पालखी तळाच्या शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक-भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धे’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी हिंद केसरी पै.दिनानाथ सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

तसेच हभप तुळशीराम दा. कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, महाराष्ट्र केसरी विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डॉ.एस.एन.पठाण, शिवम गुरूजी, डॉ. विश्वजीत नागरगोजे, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. गोपाळकृष्ण जोशी, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रा.विलास कथुरे व डॉ. टी.एन.मोरे उपस्थित होते.

यावेळी संभाजीनगर येथील पैलवान आकाश दोंगे आणि सोलापूर येथील दादासोहन माने यांच्यात उद्घाटनपर कुस्ती खेळण्यात आली.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले,” संपूर्ण विश्वालाच आपले घर मानणारे डॉ. कराड यांनी कर्तृत्वाच्या जोरावर सर्वधर्मसमभावाने आदर्श संस्था उभ्या केल्या आहेत. आम्ही सर्व एक आहोत ही एक विचारधारा घेऊन जीवन व्यतीत करीत आहेत. मानवात परमेश्वराचे रुप असून विश्वशांतीच्या कार्यासाठी ते झटत आहेत.”

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे, असा हा वारकरी संप्रदाय आहे. त्यांचे आज येथे विष्णुदास आणि समर्थ असे दर्शन घडले. आज येथे भक्ती आणि शक्तीचा संगम दिसून येत आहे.

 

हिंद केसरी पै.दिनानाथ सिंग म्हणाले, ” लाल मातीतील कुस्तीला जगविण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड अथक प्रयत्न करीत आहेत. ज्ञान सागराबरोबर त्यांनी शक्तिची पुजा केली आहे. येथे आलेल्या पैलवानांमुळे या लाल मातीची शोभा वाढली आहे. तसेच, त्यांनी या क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे.”

प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन हभप शालीकराम खंदारे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments