Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाचन संस्कृती मध्ये आपले आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य - विंग कमांडर विद्या...

वाचन संस्कृती मध्ये आपले आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य – विंग कमांडर विद्या कांत काला (निवृत्त)

डॉ. संजय रुणवाल थॉटफुल रिफ्लेक्शन्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

 

पुणे, 4 जुलै, २०२५: संजय रुणवाल फांउंडेशनचे संस्थापक आणि लेखक डॉ. संजय रुणवाल लिखित ‘थॉटफुल रिफ्लेक्शन्स फॉर अ मिनिंगफुल लाईफ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच एमईएस सभागृह, कोथरूड येथे संपन्न झाला. लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांनी प्रेरित असलेले हे पुस्तक जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करत .आत्म-चिंतन आणि वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देते. जीवनाच्या विविध टप्प्यांवर हे पुस्तक वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे , लेखक, पुरस्कारप्राप्त ब्लॉगर व एमबीटी डॉट कॉमच्या संस्थापिका आशा सेठ आणि विशेष अतिथी माय क्रॅक – द वेलनेस कोड फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विंग कमांडर विद्याकांत काला (निवृत्त) यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी लेखक डॉ. संजय रुणवाल, प्रतिभा रुणवाल, सारिका रुणवाल-खोडदे आणि गिरीराज खोडदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले.

 

कार्यक्रमात बोलताना आशा सेठ म्हणाल्या, “थॉटफुल रिफ्लेक्शन्स हे पुस्तक सर्व वयोगटातील लोकांसाठी आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांसाठी आहे. वाचकांना त्यांच्या जीवनावर खोलवर विचार करण्यास आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यास प्रोत्साहित करते .जीवन प्रवासात एका टप्प्यावर थोडे थांबून आपल्या पुढच्या प्रवासावर विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडते. हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ”

 

विंग कमांडर विद्या कांत काला (निवृत्त) यांनी दृश्य माध्यमाचे वर्चस्व असलेल्या जगात वाचनाच्या शक्तीवर भर दिला. ते म्हणाले, “आजच्या काळात आपण जास्त पाहत आहोत आणि कमी वाचत आहोत, अशा वेळी वाचनाचे परिवर्तनकारी सामर्थ्याचे महत्व समजण्याची ही योग्य वेळ आहे. पुस्तके आपल्याला नवीन दृष्टिकोन देतात, सर्जनशीलता , समस्या सोडवण्याची क्षमता वाढवतात आणि जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनविण्यास मदत करतात.डॉ. संजय रुणवाल यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी व्यक्ती आपले जीवन कसे बदलू शकते हे याचे उदाहरण आहे,”

 

प्रकाशनानंतर डॉ.संजय रुणवाल यांनी उपस्थितांशी विशेष चर्चासत्राच्या माध्यमातून संवाद साधला व पुस्तकाविषयी माहिती दिली . हे पुस्तक आत्म-जागरूकता, भावनिक बुद्धिमत्ता, वैयक्तिक विकास, अनुकूलता, आनंद,समाधान आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांचे मूल्य यासारख्या विषयांचा शोध घेते. ४०१ विचार आणि अनुभवांद्वारे, हे पुस्तक दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि एखाद्याचे जीवन सुकर करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करते.

 

सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेले, थॉटफुल रिफ्लेक्शन्स फॉर अ मिनिंगफ़ुल लाईफ हे पुस्तक जीवनाच्या सर्व स्तरातील वाचकांसाठी एक व्यावहारिक साधन म्हणून उपयुक्त ठरेल. दररोजच्या संघर्षांना समजून घेण्याची आणि सरळ, कृतीशील उपाय याबद्दल या पुस्तकात प्रभावीपणे मांडले गेले आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments