Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत कपिला परमार...

दहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत कपिला परमार ऑल स्टार्स संघाची विजयी सलामी

पुणे, 12 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत सर्वेश मुथाने(51धावा) केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कपिला परमार ऑल स्टार्स संघाने जीएम टायफून्स संघाचा 3 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना कपिला परमार ऑल स्टार्स संघाने 6 षटकात 3बाद 78 धावा केल्या. यात सर्वेश मुथाने 20चेंडूत 4चौकार व 4षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. त्याला मेहुल ओसवालने नाबाद 18 धावा काढून साथ दिली. टायफून्सकडून वेद ओसवाल(2-6), विनय मुतयाल(1-18) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

याच्या उत्तरात जीएम टायफून्स संघाला 6षटकात 2बाद 75धावाच करता आल्या. यात क्रिश शहाने 19चेंडूत 1चौकार व 4षटकाराच्या मदतीने नाबाद 36, सुमेध गांगलने 15चेंडूत 2चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 34 धावांची दिलेली लढत अपुरी ठरली. ऑल स्टार्स कडून अर्णव साठे(1-21) याने सुरेख गोलंदाजी केली.

स्पर्धेचे उदघाटन पुना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल हांडा , पुना क्लबचे उपाध्यक्ष आणि पीसीपीएलचे अध्यक्ष गौरव गढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे माजी अध्यक्ष राहुल ढोले पाटील, मनीष मेहता, शैलेश रांका, पंकज शहा, तुषार आसवानी, अमित परमार, वीणा मनसुखानी, अक्षय चंदीरमानी, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे(स्पर्धा संचालक) आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
कपिला परमार ऑल स्टार्स: 6 षटकात 3बाद 78 धावा(सर्वेश मुथा 51(20,4×4,4×6), मेहुल ओसवाल नाबाद 18(11,2×6), वेद ओसवाल 2-6, विनय मुतयाल 1-18) वि.वि.जीएम टायफून्स: 6षटकात 2बाद 75धावा(क्रिश शहा नाबाद 36(19,1×4,4×6), सुमेध गांगल 34(15,2×4,3×6), अर्णव साठे 1-21); सामनावीर – सर्वेश मुथा; कपिला परमार ऑल स्टार्स संघ 3 धावांनी विजयी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments