Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे कॅम्प येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी माजी सैनिकांचा मेळावा*

पुणे कॅम्प येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी माजी सैनिकांचा मेळावा*

*

पुणे, दि. १२ : रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी, कॅन्टीन या बाबतच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी १५ व १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मिल्खासिंग पार्क, कमाण्ड एम. टी. समोर, घोरपडी, पुणे कॅम्प येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

या सैनिक मेळाव्यास संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट संबोधित करणार आहेत. माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांनी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), पुणे यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments