*
पुणे, दि. १२: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट विषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी मोहिमेत सहभागी होऊन मतदान प्रक्रियेविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत तज्ज्ञ व्यक्तीमार्फत माहिती देण्यात येत आहे. निवारा वृद्धाश्रम नवी पेठ आणि साई श्रद्धा महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी-चिंचवड, वेल्हा येथे प्रशासनातर्फे ईव्हीएम विषयी प्रात्यक्षिक दाखवून जनजागृती करण्यात आली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रकियेविषयी नागरिकांना माहिती नागरिकांना होणे गरजेचे असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले आहे.
००००