भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने आपल्या २जी हँडसेट ग्राहकांसाठी वी गॅरंटी प्रोग्राम सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत १९९ आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या प्रत्येक अनलिमिटेड व्हॉइस रिचार्ज पॅकसोबत २४ दिवसांच्या अतिरिक्त वैधतेचे लाभ १२ महिन्यांच्या अवधीमध्ये दिले जातील, तर २ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाईल.
फक्त कॉल सुविधा किंवा खूप कमी डेटा वापर करणाऱ्या ग्राहकांना दीर्घकाळापासून भेडसावणारे एकाच महिन्यात पुन्हा रिचार्ज करावे लागण्याचे आव्हान दूर करणे हा वी गॅरंटी प्रोग्रामचा उद्देश आहे. आधीपासून सुरु असलेल्या २८ दिवसांच्या पॅकसोबत ग्राहकांना एकाच कॅलेंडर महिन्यात दोनदा रिचार्ज करावे लागते किंवा काहीवेळा सेवा खंडित झाल्यामुळे गैरसोय सहन करावी लागते.
वी गॅरंटीमुळे आता ग्राहकांना २८ दिवसांच्या ऐवजी ३० दिवसांची सेवा वैधता मिळेल, एका महिन्यात एकदाच रिचार्ज करावे लागेल. २८ दिवसांपेक्षा जास्त वैधतेच्या रिचार्जमध्ये देखील हे अतिरिक्त २ दिवस रिचार्ज सायकलमधील अंतर भरून काढण्यात मदत करतात. सहाजिकच ग्राहकांना अधिक जास्त सुविधा आणि अखंडित सेवा अनुभवता येते.
वी गॅरंटी लाभ २जी हँडसेट वापरणाऱ्या आणि १९९ किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे अनलिमिटेड व्हॉइस रिचार्ज पॅक वापरणाऱ्या प्रीपेड ग्राहकांसाठी लागू आहे.
वी गॅरंटी अतिरिक्त वैधता लाभ देणाऱ्या काही पॅक्सची यादी:
एमआरपी
पॅकसोबत मिळणारे लाभ
असम, ईशान्य भारत, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि राजस्थानसाठी पॅक लाभ
पॅक वैधता
वी गॅरंटीचे अतिरिक्त वैधता लाभ
१९९
अनलिमिटेड कॉल + २जीबी + ३००एसएमएस
अनलिमिटेड कॉल + ३जीबी + ३००एसएमएस
२८ दिवस
२ दिवस
२०९
अनलिमिटेड कॉल + २जीबी + ३००एसएमएस + कॉलर ट्यून
अनलिमिटेड कॉल + ३जीबी + ३००एसएमएस + कॉलर ट्यून
२८ दिवस
२ दिवस
४जी आणि ५जी ग्राहकांसाठी वी गॅरंटी प्रोग्राम गेल्या वर्षी सुरु करण्यात आला होता. संपूर्ण वर्षभरात १३०जीबी गॅरंटीड अतिरिक्त डेटा देणे सुरु राहील, १३ सलग सायकल्समध्ये दर २८ दिवसांनी १०जीबी आपोआप क्रेडिट केले जातील. या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांकडे २९९ किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या दैनंदिन डेटा अनलिमिटेड प्लॅन्स असणे आवश्यक आहे.
युएसएसडी *९९९# मार्फत किंवा १२१२ वर फोन करून वी गॅरंटी – अतिरिक्त वैधता लाभ तुम्ही मिळवू शकाल. वी गॅरंटी – अतिरिक्त डेटा ऑफर वी ऍपवरून देखील मिळवता येईल.


