Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील कार्यालयीन जागांनी २०२५ च्या पहिल्या सहामाहीमध्ये ६.८ दशलक्ष चौ. फुट इतक्या...

पुण्यातील कार्यालयीन जागांनी २०२५ च्या पहिल्या सहामाहीमध्ये ६.८ दशलक्ष चौ. फुट इतक्या प्रचंड प्रमाणात भाडेतत्वा करारांची नोंद केली, यंदा १० दशलक्ष चौ. फुट असा ऐतिहासिक टप्पा गाठण्यास सज्ज: कुशमन अॅण्ड वेकफिल्ड

पुणे, ९ जुलै २०२५ — पुण्यातील कार्यालयीन जागांची बाजारपेठ २०२५ मध्ये नवा मापदंड रचण्यास सज्ज झाली आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजेच ६.८ दशलक्ष चौ. फुट (मिलियन स्क्वेअर फीट-एमएसएफ) इतक्या प्रमाणात भाडेतत्वावरील करार म्हणजेच ग्रॉस लीझिंग व्हॉल्युम (जीएलव्ही)चा टप्पा गाठणाऱ्या या बाजारपेठेने मागील वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ६७ टक्के आणि २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत ५४ टक्के वाढ अनुभवल्याचे कुशमन अॅण्ड वेकफिल्डच्या नव्या Q2 मार्केटबीट रिपोर्ट या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठेतील सर्व भाडेतत्वाच्या व्यवहारांमधील जीएलव्ही प्रमाण म्हणजेच नव्याने जागा घेणे, कॉर्पोरेट्सकडून कराराचे नुतनीकरण तसेच प्री-लीझिंग असे सर्व करार बाजारपेठेतील एकूण व्यवहारांचे निदर्शक आहेत. २०२५ च्या पहिल्या सहामाहीतील देशभरातील ४२ जीएलव्हीमध्ये पुणे शहराचा वाटा १६% (६.८ एमएसएफ) आहे. बेंगळुरु (९.९ एमएसएफ), मुंबई (८.२ एमएसएफ) आणि दिल्ली एनसीआर (७.४ एमएसएफ) सोबत पुणे पहिल्या चार शहरांमध्ये आहे.

 

२०२५ मध्ये पुण्याचा जीएलव्ही १० एमएसएफचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे. या दृष्टीने हे ऐतिहासिक उच्चांकाचे वर्ष असणार आहे. भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात पुणे शहराचे वाढते महत्त्व यातून अधोरेखित होत आहे.

 

2021

 

2022

 

2023

 

2024

 

2025

 

H1

 

H2

 

H1

 

H2

 

H1

 

H2

 

H1

 

H2

 

H1

 

1.9

 

2.9

 

4.0

 

2.7

 

6.2

 

3.5

 

4.1

 

4.4

 

6.8

 

स्रोत: कुशमन अॅण्ड वेकफिल्ड

 

इंजिनीअरिंग आणि उत्पादन, आयटी-बीपीएम, फ्लेक्झिबल वर्कप्लेस अशा क्षेत्रातून एकत्रितरित्या झालेल्या दमदार मागणीमुळे २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ~4.6 msf (जवळपास 70% टक्के वाटा) इतक्या व्यवहारांची नोंद झाली. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत एकूण ~2.7 msf जीसीसीची नोंद झाली. जीसीसीमध्ये बीएफएसआय, इंजिनीअरिंग आणि उत्पादन ही क्षेत्रे अनुक्रमे ३६, ५१ आणि १० टक्के वाटा उचलत आघाडीवर आहेत.

 

फ्लेक्झिबल वर्कस्पेसेस सातत्याने वृद्धिंगत होत आहेत. यामुळे बेंगळुरुनंतर फ्लेक्स बाजारपेठेत पुण्याला दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून दृढ स्थान मिळाले आहे. मागील तीन वर्षांपासून पुण्यातील फ्लेक्झिबल वर्कस्पेसेसने सरासरी वार्षिक 1.56 msf हे प्रमाण राखले आहे म्हणजेच शहराच्या एकूण जीएलव्हीमधील जवळपास १९ टक्के वाटा.

 

पुरवठाही सातत्याने दमदार राहिला आहे

 

पुरवठ्याबद्दल बोलायचे तर, दुसऱ्या तिमाहीत पुण्यात सुयोग्य प्रमाणात नव्या कार्यालयीन जागा सादर झाल्या. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत जवळपास ८ एमएसएफ नव्या जागांचा पुरवठा झाला, यात मुख्यत: ९० टक्के जागा ए आणि ए+ वर्गातील कार्यालयीन जागा आहेत. मात्र, पुरवठ्यातील या वाढीमुळे रिकाम्या जागांमध्ये काही प्रमाणात म्हणजेच १२ ते १३ टक्के वाढ झाली. हा बदल बाजारपेठेत सकारात्मकरित्या पाहिला जात आहे. अनेक वर्षं रिकाम्या जागांचे प्रमाण १० टक्क्यांहून कमी होते. मात्र, आता अधिक समतोल बाजारपेठीय वातावरणात वेगाने व्यवहार होत आहेत आणि मोठ्या जागा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अधिक पर्यायही उपलब्ध होत आहेत.

 

२०२५ च्या अखेरपर्यंत जागांमध्ये याच पद्धतीने दर्जेदार वाढ झाल्यास रिकाम्या जागांचे प्रमाण १५ ते १६ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. परिणामी बाजारपेठेत अधिक समतोल साधला जाईल. वर्षाखेरीस या बाजारपेठेतील नव्या कार्यालयीन जागांचे प्रमाण १५ एमएसएफच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. पुण्यातील कार्यालयीन बाजारपेठेसाठी हा ऐतिहासिक टप्पा असेल.

 

या घडामोडींबद्दल कुशमन अॅण्ड वेकफिल्डचे पुण्यातील व्यवस्थापकीय संचालक मोइनुद्दीन पटेल म्हणाले, “पुण्यातील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच ग्रॉस लीझिंग व्हॉल्युम्समध्ये १० दशलक्ष चौ. फुटांचा टप्पा ओलांडला जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुण्याची बाजारपेठ एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सातत्यपूर्ण मागणीमुळे ही लक्षणीय वाढ होणार आहे. फ्लेक्झिबल वर्कस्पेस विभागातील सातत्यपूर्ण वाढ, इंजिनीअरिंग आणि उत्पादन कंपन्यांची लवचिकता आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) ची स्थिर वाढ या सर्व मुद्द्यांमुळे भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याचे धोरणात्म

क महत्त्व वाढत आहे. उच्च दर्जाच्या जागांचा पुरवठा आणि अधिक

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments