Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत सरकारच्या खाण मंत्रालय आणि भारतीय खाण ब्युरोकडून 'द सांडूर मॅंगेनीज अ‍ॅण्ड...

भारत सरकारच्या खाण मंत्रालय आणि भारतीय खाण ब्युरोकडून ‘द सांडूर मॅंगेनीज अ‍ॅण्ड आयर्न ओअर्स लिमिटेड’ (एसएमआयओआरई) या कंपनीला प्रतिष्ठेचे ‘सेव्हन स्टार रेटिंग’ पुरस्कार प्रदान

निसर्गाचा समतोल राखत पर्यावरणपूरक पद्धतीने खाणकाम (ग्रीन मायनिंग) करण्याबाबत कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

 

• 2023-24 या वर्षासाठी देशभरातील केवळ तीन खाणींपैकी ‘एसएमआयओआरई’ ही सेव्हन स्टार रेटिंग मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे.

 

• विशेष म्हणजे, खाण मंत्रालय व भारतीय खाण ब्युरो यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्टार रेटिंग सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ‘एसएमआयओआरई’ला मागील 10 वर्षांपासून सलग फायव्ह स्टार रेटिंग प्राप्त होत आहे.

 

पुणे, 9 जुलै 2025 : खासगी क्षेत्रातील अग्रगण्य धातू व खाण कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘‘द सांडूर मॅंगेनीज अ‍ॅण्ड आयर्न ओअर्स लिमिटेड’ (‘एसएमआयओआरई’ किंवा ‘कंपनी’) ला 2023-24 या वर्षातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि पर्यावरणपूरक खाणकामातील (ग्रीन मायनिंग) सर्वोत्तम पद्धतींसाठी खाण मंत्रालय व भारतीय खाण ब्युरो यांच्या वतीने प्रतिष्ठेचा सेव्हन स्टार रेटेड माइन सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ 7 जुलै 2025 रोजी जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडला. भारतातील फाइव्ह स्टार व सेव्हन स्टार रेटेड खाणींना गौरवण्यासाठी आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाचा हा भाग होता.

 

हा पुरस्कार भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) यांच्यातर्फे सुरू करण्यात आला आहे. माननीय राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. भजनलाल शर्मा यांच्या हस्ते सेव्हन स्टार रेटिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माननीय कोळसा आणि खाण मंत्री श्री. जी. किशन रेड्डी उपस्थित होते.

 

देशभरातील सेव्हन स्टार रेटिंग प्राप्त करणाऱ्या तीन खाणींपैकी एसएमआयओआरई ही पहिली आणि दक्षिण भारतातील एकमेव खाण ठरली आहे. याशिवाय, बल्लारी जिल्ह्यातील सांडूर तालुक्यातील कम्मथुरू येथील लोखंडाच्या खाणीत शाश्वत विकासासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांची दखल घेत, कंपनीला 2023–24 या वर्षासाठी फाइव्ह स्टार रेटिंग देण्यात आले. ही खाण एकूण 1,860.10 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेली आहे.

 

शाश्वत खाणकामाला प्रोत्साहन देणे आणि उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून नवे निकष निर्माण करणाऱ्या आदर्श पद्धतींची दखल घेणे असा भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) यांनी सुरू केलेल्या या पुरस्कारांचा उद्देश आहे. कार्यक्षमतेचे महत्त्वाचे निकष पूर्ण करणाऱ्या खाणींना हे पुरस्कार देण्यात येतात.

 

आपला अभिमान व कृतज्ञता व्यक्त करताना एसएमआओआरईचे व्यवस्थापकीय संचालक बहिर्जी ए. घोरपडे म्हणाले,

 

“शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण, सुरक्षा, तांत्रिक नवप्रवर्तन आणि स्थानिक समुदायाच्या सहभागाबाबत आमची बांधिलकी गेल्या दशकभरातील उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि क्षेत्राकडून दखल घेतली गेल्याने अधिक बळकट झाली आहे. आपण जिथे कार्यरत आहोत त्या भागांमध्ये सध्याच्या आणि भावी पिढ्यांचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय हित जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या टीमने सातत्याने या महत्त्वाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दाखवली आहे, याचा मला मनापासून अभिमान आहे. आम्हाला सुरुवातीपासूनच ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ मिळाले होते. आता आम्हाला ‘सेव्हन स्टार रेटिंग’सारखा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे, याचे समाधान वाटते. नव्या पद्धतीच्या खाणकामाचा मार्ग दाखवत नवीन मापदंड निर्माण करणाऱ्या आमच्या टीमचे मी अभिनंदन करतो.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments