सूड, रहस्‍य आणि प्रेमाची अनोखी कहाणी: ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’मध्‍ये रीम शेख अंकिता पांडेच्‍या भूमिकेत

तारां कित Avatar

प्रतिक्षाकाळ अखेर संपला आहे, जेथे सोनी लिव्‍हचा डिजिटल एंटरटेनर, लक्षवेधक कायदेशीर ड्रामा ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’ प्‍लॅटफॉर्मवर १२ फेब्रुवारी रोजी सुरू होण्‍यास सज्‍ज आहे. या सिरीजचे खास आकर्षण आहे रीम समीर शेख, जी सिरीजमध्‍ये अंकिता पांडेची भूमिका साकारत आहे.

अंकिता पांडेची भूमिका गुंतागूंतीची असली तरीही तुम्‍ही तिच्‍याशी जुडले जाल. प्रेक्षकांना अंकिताच्‍या जगतातील अनेक ट्विस्‍ट्स व वळण पाहायला मिळतील, ज्‍यामध्‍ये वास्‍तविकता व काल्‍पनिकतेचे सुरेख संयोजन पाहायला मिळेल. आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना रीम म्‍हणाल्‍या, ”सिरीज ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’मध्‍ये अंकिताची भूमिका साकारण्‍याचा अनुभव माझ्यासाठी अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे. या सिरीजसह मी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे, तसेच मी पहिल्‍यांदाच नकारात्‍मक भूमिका साकारत आहे. अंकिता आणि माझ्यामध्‍ये विभिन्‍नता असली तरी फक्‍त २० मिनिटांचा मेकअप आणि कॉस्‍चूम मला तिच्‍या विश्‍वामध्‍ये घेऊन जातात, ज्‍यामध्‍ये सूड व क्रोध सामावलेले आहेत. या भूमिकेने मला सुलभता देण्‍यासह अंकिताच्‍या मानसिकतेमध्‍ये नेले आहे, ज्‍यामुळे मला तिच्‍या नात्‍यामधील गुंतागूंतींना सहजपणे सादर करता येईल.”

सूड, प्रेम आणि रहस्‍याच्‍या या लक्षवेधक कथेचे विवरण पाहण्‍यास सज्‍ज राहा, जेथे सोनी लिव्‍हवर रीम समीर शेख अंकिता पांडेच्‍या भूमिकेत दिसणार आहे. तिच्‍याव्‍यतिरिक्‍त जेनिफर विंगेट, करण वाही आणि संजय नाथ या सिरीजमध्‍ये प्रमुख भूमिकेत आहेत. ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’ या तीन व्‍यावसायिकांच्‍या जीवनाला सादर करण्‍यासह नैतिक पेचप्रसंगांची गुंतागूंत आणि सोप्या मार्गापेक्षा योग्य मार्ग निवडण्याच्‍या आव्‍हानाला दाखवते.

पहा ‘रायसिंघानी व्‍हर्सेस रायसिंघानी’ १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता फक्‍त सोनी लिव्‍हवर

Tagged in :

तारां कित Avatar