*
पुणे, दि. १३: सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि मित्र क्लिनिक व सेंटर फॉर ॲडव्होकसी अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तृतीयपंथी नागरिकांना प्रमाणपत्र, ओळखपत्राचा लाभ देण्यासाठी म्हस्के गुरु आश्रम, प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाच्या जवळ, रुपीनगर-सहयोग नगर, निगडी येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तृतीयपंथी नागरिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरीता आवश्यक असणारे मुद्रांक कागद व करारपत्राची (नोटरी) मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ५० वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथी व्यक्तींसाठी निवृत्तीवेतन योजना आणि शिधापत्रिका काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तृतीयपंथी व्यक्तींच्या एचआयव्ही, एचबीव्ही, एचव्हीसी, एस. क्रियाटीनीन, आरपीआर अशा सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व तृतीयपंथी नागरिकांनी शिबीरामध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
0000