पुणे, 13 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत जेटस, फोर ओक्स सेलर्स, व्हीएनएन वुल्व्हस, व्हीके टायगर्स, मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात चिराग लुल्ला (नाबाद 40) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर जेटस संघाने ईगल्स संघाचा 8गडी राखुन पराभव केला. रौनक ढोले पाटील(नाबाद 58धावा व 1-6)याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर फोर ओक्स सेलर्स संघाने तलब टायटन्स संघाचा 36 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली.
अन्य लढतीत किरण देशमुख(56धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर व्हीके टायगर्स संघाने क्वालिटी वॉरियर्स संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवला. भार्गव पाठक नाबाद 60धावांच्या खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने पृथ्वी लायन्स संघाचा 7 गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली.
निकाल: साखळी फेरी:
हिलयॉस ईगल्स:6 षटकात 4बाद 70धावा(अनमोल लिमये 21(12,2×4), ऋषी चैनानी नाबाद 24(9,4×4,1×6), धवल गुंडेचा 2-2, नीव नवानी 1-9) पराभुत वि.जेटस: 4.3षटकात 1बाद 71धावा(चिराग लुल्ला नाबाद 40(13,5×4,2×6), मल्लिक अर्जुन नाबाद 28(15,4×4), विजय सामंत 1-14); सामनावीर – चिराग लुल्ला; जेटस संघ 8 गडी राखून विजयी;
फोर ओक्स सेलर्स:6 षटकात बिनबाद 102धावा(रौनक ढोले पाटील नाबाद 58(21,5×4,4×6), तारिक नाबाद 43(15,4×4,3×6)वि.वि.तलब टायटन्स:6 षटकात 5बाद 66धावा(करण नाबाद 28, अमित के 11, अरुण खट्टर 10, सचिन मेनन 2-13, रौनक ढोले पाटील 1-6);सामनावीर-रौनक ढोले पाटील; फोर ओक्स सेलर्स संघ 36 धावांनी विजयी;
व्हीएनएन वुल्व्हस: 6 षटकात 2बाद 57धावा(तुषार आसवानी 39(22,2×4,2×6), विक्रम दामले 10, प्रीतम लुनावत 1-4)वि.वि.ओबेरॉय अँड नील किंग्स: 6 षटकात 6बाद 53धावा(विनीत परमार 14, जमीर 12, अभिषेक दळवी 2-6, तुषार आसवानी 1-5);सामनावीर-तुषार आसवानी; व्हीएनएन वुल्व्हस संघ 4 गडी राखून विजयी;
व्हीके टायगर्स: 6 षटकात 3बाद 90धावा(किरण देशमुख 56(19,2×4,7×6), विक्रम काकडे 17, चिराग परमार 1-11)वि.वि.क्वालिटी वॉरियर्स: 6 षटकात 4बाद 89धावा(झियान तलब नाबाद 52(18,3×4, 5×6), टोनी शेट्टी नाबाद 16(6,1×4,1×6), विक्रम काकडे 2-14, समीर सय्यद 1-6); सामनावीर -किरण देशमुख; व्हीके टायगर्स संघ 1 धावेने विजय;
पृथ्वी लायन्स: 6 षटकात 2बाद 78धावा(खालिद परवानी नाबाद 27(11,1×4,2×6), मनप्रीत 23(11,2×4,1×6), उमेश पिल्ले 1-12)पराभुत वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स: 5.5 षटकात 1बाद 81धावा(भार्गव पाठक नाबाद 60(21,4×4,5×6), सिद्धांत धर्मा 20(14,2×4));सामनावीर – भार्गव पाठक; जॅग्वार्स 7 गडी राखून विजयी


