Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २० जुलैला पुण्यात प्रांत समन्वय बैठक* 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २० जुलैला पुण्यात प्रांत समन्वय बैठक* 

 

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची वार्षिक प्रांत समन्वय बैठक येत्या २० जुलै रोजी (रविवारी) पुण्यात पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रांतातील विविध संघप्रेरित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, एकूण ५० संघटनांमधून सुमारे ४३४ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी दिली.

 

या बैठकीमध्ये संघाच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या सेवा, आर्थिक, वैचारिक, सुरक्षा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांचे संघटनात्मक कार्य, यावर चर्चा होणार आहे.

संघटनात्मकदृष्ट्या ही बैठक अत्यंत महत्त्वाची असते.

या बैठकीत प्रांत पातळीवर कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये आपापल्या क्षेत्रातील संघटनात्मक स्थिती, संघ शताब्दीनिमित्तचे कार्यक्रम, पंच परिवर्तन या विषयावर चर्चा होईल. विविध संघटनांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जाईल.

या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा व महिला कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे.

ही बैठक फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments