Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडिक्यूब स्पेसेस लिमिटेड (पूर्वी इंडिक्यूब स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, इनोव्हेंट स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड...

इंडिक्यूब स्पेसेस लिमिटेड (पूर्वी इंडिक्यूब स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, इनोव्हेंट स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची प्राथमिक समभाग विक्री बुधवार, 23 जुलै 2025 पासून होणार सुरू

राष्ट्रीय, 18 जुलै 2025: इंडिक्यूब स्पेसेस लिमिटेड (पूर्वी इंडिक्यूब स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, इनोव्हेंट स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) (“कंपनी”) बुधवार, 23 जुलै 2025 रोजी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) सुरू करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक बोली/ऑफर उघडण्याच्या एक कार्यदिवस आधी म्हणजे मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी असेल. बोली /ऑफर बंद होण्याचा दिनांक शुक्रवार, 25 जुलै 2025 आहे.

 

 

 

या ऑफरचा 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी किंमतपट्टा 225 रु. ते 237 रु. निश्चित करण्यात आला आहे. बोली 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी किमान 63 इक्विटी शेअर्सकरता आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी 63 च्या पटीत लावता येईल.

 

 

 

या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 6,500 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक विक्री करणारे समभागधारक – ऋषी दास आणि मेघना अगरवाल यांच्याकडून 500 दशलक्ष रु. पर्यंतच्या शेअर्सचा विक्रीसाठीचा प्रस्ताव (Offer for Sale) यांचा समावेश आहे.

 

 

 

ऑफरमध्ये प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सपैकी 15 दशलक्ष रु. पर्यंत मूल्याच्या शेअर्ससाठी पात्र कर्मचार्‍यांसाठी आरक्षण (“कर्मचारी आरक्षण भाग”) समाविष्ट आहे. ऑफरमधून कर्मचारी आरक्षण भाग वजा केल्यावर उर्वरित भाग “नेट ऑफर” म्हणून ओळखला जातो. कर्मचारी आरक्षण भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचार्‍यांसाठी प्रति इक्विटी शेअरवर 22 रु. इतकी सवलत (“Employee Discount”) देण्यात येत आहे.

 

 

 

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) यावर सूचीबद्ध होण्याचा प्रस्ताव आहे.

 

 

 

या ऑफरसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

दिनांक 17 जुलै 2025 ची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) लिंक:

 

 

 

https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/RHP%20-%20Indiqube%20Spaces%20Limited.pdf

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments