Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedमगरपट्टा सिटी येथील नागरिकांसाठी सीपीआर प्रशिक्षण *राष्ट्रीय सीपीआर आणि एईडी जागरूकता सप्ताहनिमित्त...

मगरपट्टा सिटी येथील नागरिकांसाठी सीपीआर प्रशिक्षण *राष्ट्रीय सीपीआर आणि एईडी जागरूकता सप्ताहनिमित्त नोबल हॉस्पिटलचा उपक्रम

पुणे, 22 जुलै २०२५ : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे मगरपट्टा सिटी येथे राष्ट्रीय सीपीआर आणि एईडी जागरूकता सप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीपीआर प्रशिक्षण सत्रात नोबल हॉस्पिटल्स मधील डॉ.जयप्रतिभा वर्शानी,डॉ. प्रथमेश राऊत आणि डॉ.नवनाथ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. एकूण ८५ नागरिकांनी या सत्रात सक्रिय सहभाग घेतला. हृदयविकाराच्या झटक्यावर तातडीने प्रतिक्रिया देण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी लोकांना सीपीआर आणि एईडी वापरण्यासाठी तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश्य होता.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडल्यास नेमके काय करावे हे अनेकांना माहित नसते. म्हणूनच एईडी उपकरणाचा वापर आणि सीपीआर प्रशिक्षण हे जीवन वाचविणारे कौशल्य महत्वाचे ठरते.या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments