पुणे
प्रवर्तन फाउंडेशन,रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाञ्चजन्य फाउंडेशन ह्या तीन संस्था कश्मिर येथील भारतीय सीमेवरील सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवत असतात.
येत्या रक्षाबंधन निमित्त ‘सुरक्षाबंधन’ या उपक्रमांतर्गत या संस्था सीमेवरील जवानांसाठी ७५०० हून अधिक राख्या व २००० शुभेच्छापत्रे पाठवणार आहेत. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे.
सदर उपक्रमात पुण्यातील डहाणूकर कॉलनी स्थित विद्या प्रतिष्ठानची सरस्वती विद्या मंदिर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला , मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण इंग्लिश मिडीयम व मएसो सिनीयर कॉलेज, कासार आंबोली येथे राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,रेणुका स्वरूप मुलींची शाळा व बारामतीच्या म.ए.सो हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल ने तर शिक्षण प्रसारक मंडळीच्या एस.पी. एम. इंग्लिश मिडीयम स्कूल व त्याच बरोबर धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संचलितकै नामदेव बंडोजी चव्हाण विद्यालय धायरी पुणे- ४१ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
विशेष म्हणजे कोथरुड येथील ‘दि पूना स्कूल ॲंड होम फॉर दि ब्लाइंड गर्ल्स’ व शिक्षण प्रसारक मंडळीची ‘वि. रा. रुईया मूकबधीर विद्यालय’ या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी व सेवासदन संस्थेच्या दिव्यांग महिलांनी आपल्या जवानांसाठी सीमेवर राख्या पाठविल्या आहेत.


