Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedगिरिराज हॉस्पिटल बारामती व के.ई.एम हॉस्पिटल पुणे तर्फे मोफत मेंदू विकार व...

गिरिराज हॉस्पिटल बारामती व के.ई.एम हॉस्पिटल पुणे तर्फे मोफत मेंदू विकार व मूत्रपिंड विकार निदान-उपचार शिबीर

पुणे, 23 जुलै २०२५ : गिरिराज हॉस्पिटल बारामती व के.ई.एम हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मेंदू विकार व मूत्रपिंड विकार निदान-उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर रविवार, दि.२७ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० पर्यंत बारामती येथील एस.टी स्थानक जवळील गिरिराज हॉस्पिटल येथे होणार आहे. तीव्र डोके दुखी,फिट येणे,अर्धशिशी,सतत चक्कर येणे,चालताना तोल जाणे,अडखळणे व मूत्रपिंड विकार संबंधित लक्षणे असणारे महिला, पुरुष व लहान मुले यात सहभागी होणे अपेक्षित आहे.

या शिबिरात मूत्रपिंड विकार तज्ञ डॉ. विपूल चाकूरकर, मेंदू विकार तज्ञ डॉ. धैर्यशील सस्ते आणि बाल मेंदू विकार तज्ञ डॉ.अभिजीत बोत्रे सहभागी होणार आहेत. सी.टी. स्कॅन, इ.इ.जी, एमआरआय, लॅब टेस्टकरीता ३०% सवलत या शिबिरामध्ये मिळणार आहे.

शिबिरात सहभागी होण्याकरिता 8530435511 या क्रमांकावर नोंदणी करता येणार आहे. कृपया पूर्व तपासणी व उपचारांची कागदपत्रे सोबत घेऊन येणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments