ग्राहकांना जागतिक स्तराची आर्थिक विशेषज्ञता प्रदान करण्याच्या आपल्या वचनाची पुन्हा एकदा पुष्टी केली
· एमडीआरटी सदस्यांची संख्या वाढून २८७१ वर पोहचली (मागील वर्षीच्या २५८४ च्या तुलनेत वाढ)
o टाटा एआयए पहिल्या स्थानावर (सलग तिसऱ्या वर्षी)
o जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावर (मागील वर्षी सहाव्या स्थानावर)
o महिला एमडीआरटी संख्येमध्ये जागतिक स्तरावर सातव्या स्थानावर (मागील वर्षी देखील सातव्या स्थानावर)
मुंबई, १९ जुलै, २०२५: टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (टाटा एआयए) सलग तिसऱ्या वर्षी भारतामध्ये मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) सदस्यांची सर्वात जास्त संख्या नोंदवली आहे, तसेच चौथे जागतिक रँकिंग देखील मिळवले आहे. एमडीआरटी क्वालिफायर्सच्या विक्रमी २८७१ संख्येसह, हे यश मागील वर्षीच्या तुलनेत ११% ची वाढ आणि टाटा एआयएच्या सल्लागारांची वाढती क्षमता व कामावरील अतूट निष्ठा दर्शवते.
हे उल्लेखनीय यश एमडीआरटी-क्वालिफाईड सल्लागारांच्या विशेषज्ञतेला अनुरूप, सर्वोत्कृष्ट आर्थिक सल्ला प्रदान करण्याची टाटा एआयएची वचनबद्धता अधोरेखित करते. त्यामुळे ग्राहकांना असाधारण सेवा आणि मार्गदर्शन मिळते.
टाटा एआयएने वैविध्य आणि सर्वसामावेशाप्रती आपल्या बांधिलकीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. १३४३ महिला एमडीआरटी सदस्यांसह, टाटा एआयएने महिला सदस्यतेच्या आधारे, आघाडीच्या २५ कंपन्यांमध्ये जागतिक स्तरावर ७वे स्थान मिळवले आहे. महिला एमडीआरटी क्वालिफायरमध्ये ८.५% ची वाढ, आर्थिक क्षेत्रात महिलांना सशक्त बनवण्याचे टाटा एआयएचे सातत्यपूर्ण प्रयत्न दर्शवते. त्यामुळे हे सुनिश्चित होते की, ग्राहकांना सल्लागारांच्या एका वैविध्यपूर्ण टीमकडून दिला जाणारा तज्ञ, जागतिक स्तराची आर्थिक सल्ला मिळेल.
तुमच्यासाठी याचा अर्थ काय आहे?
एमडीआरटी – आर्थिक सल्ल्यामध्ये सुवर्ण मापदंड
एमडीआरटी सदस्य असणे हा जगभरामध्ये जीवन विमा आणि आर्थिक सेवा प्रोफेशनल्ससाठी सर्वोच्च मापदंड मानला जातो. हे सल्लागार सर्वोच्च स्तराचे प्रोफेशनल ज्ञान, काटेकोर नैतिक आचरण आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी अतूट वचनबद्धता दर्शवतात. जेव्हा तुम्ही टाटा एआयए सल्लागार निवडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार सर्वोत्तम आर्थिक सल्ला मिळेल याचे आश्वासन मिळते, त्यामुळे तुम्हाला तुमचे वर्तमान आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यात मदत मिळते.
एमडीआरटी सल्लागार: तुमची आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात तुमची मदत
टाटा एआयएचे एमडीआरटी-क्वालिफाईड सल्लागार फक्त जीवन विमा योजना विकत नाहीत तर आपल्या नैपुण्याचा उपयोग करून तुम्हाला असे माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मार्गदर्शन प्रदान करतात, जे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना अनुरूप असतात. सेवानिवृत्ती नियोजन करणे असो, आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणे असो किंवा आपल्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त लाभ घेणे असो, तुम्हाला सर्वसमावेशक, विश्वसनीय सल्ला मिळेल जो त्यांचे अनुभव आणि कामाप्रती निष्ठेतून आलेला असेल.
करियर संधी: एमडीआरटी सल्लागार बनण्यासाठी सर्वोत्तम स्थान
टाटा एआयए अशा व्यक्तींसाठी पुरस्कृत करियर संधी उपलब्ध करवून देण्यासाठी बांधील आहे जे परिवर्तन घडवून आणण्यासाठी उत्सुक आहेत. एमडीआरटी क्वालिफिकेशनला प्रोत्साहन देऊन, टाटा एआयए महत्त्वाकांक्षी आर्थिक सल्लागारांसाठी एक सुस्पष्ट करियर मार्ग प्रदान करतो. आपल्या प्रीमियर एजन्सी मॉडेलच्या माध्यमातून टाटा एआयए सर्वोत्तम प्रतिभावंतांची निवड करून त्यांना अधिक व्यापक प्रशिक्षण, करियरमधील प्रगती आणि सर्वसमावेशक डिजिटल साहाय्य प्रदान करते.
लोकांमध्ये ही गुंतवणूक फक्त कंपनीच्या सल्लागारांचे नेटवर्क मजबूत करत नाही तर हे देखील सुनिश्चित करते की, आर्थिक सेवांमध्ये एक सार्थक आणि प्रभावी करियरच्या शोधात असलेल्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतील. टाटा एआयएची मजबूत सहायता प्रणाली सल्लागारांना एमडीआरटीचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक उपकरणे प्रदान करते, याचाच अर्थ असा की, जास्त उत्पन्न मिळवण्याची शक्यता आणि एक आनंददायी करियर जे लोकांना त्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यात मदत करेल.
टाटा एआयएचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर – प्रोप्रायटरी बिझनेस, अलाईड चॅनेल्स अँड एजन्सी सेल्स, श्री अमित दवे यांनी सांगितले, “एमडीआरटी रँकिंगमध्ये जागतिक स्तरावर चौथे स्थान मिळवणे आणि भारतामध्ये उद्योगक्षेत्राचे नेतृत्व करणे ही खरोखरीच अभिमानास्पद बाब आहे. हे यश आमच्या प्रीमियर एजन्सी मॉडेलचे यश आणि आमच्या सल्लागारांच्या अथक वचनबद्धतेचे प्रमाण आहे. एमडीआरटी क्वालिफिकेशन आमच्या सल्लागारांसाठी फक्त एक व्यक्तिगत यश नाही तर आमच्या ग्राहकांसाठी टाटा एआयएमध्ये विश्वासाचे प्रतिनिधित्व करते, त्यांना याची पुरेपूर खात्री असते की त्यांना जागतिक स्तराचा आर्थिक सल्ला मिळत आहे.”
टाटा एआयएमध्ये एमडीआरटी व्यावसायिक परिणाम कसे वाढवतात
एमडीआरटी-क्वालिफाईड सल्लागार जीवन विमा कंपन्यांना एक विशिष्ट लाभ – तज्ञांचे मार्गदर्शन प्रदान करतात, त्यामुळे ग्राहक अधिक संतुष्ट होतात आणि ब्रँडकडे जास्त ग्राहक टिकून राहतात. टाटा एआयएमध्ये आमचे एमडीआरटी सल्लागार असामान्य सेवा प्रदान करण्यात आणि निष्ठावान ग्राहकांची संख्या वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी, टाटा एआयए पाचपैकी चार पर्सिस्टन्सी समूहांमध्ये आघाडीवर आहे, त्यामध्ये महत्त्वाची १३व्या महिन्याची पर्सिस्टन्सी देखील आहे, जे ग्राहकांची निष्ठा आणि दीर्घकालीन आर्थिक आरोग्याचे एक प्रमुख माप आहे. पर्सिस्टन्सी अशा ग्राहकांची संख्या ट्रॅक करते जे आपल्या पॉलिसींचे नूतनीकरण करतात, ही बाब आमच्या सेवांवरील त्यांचा विश्वास दर्शवते.
एमडीआरटी-क्वालिफाईड सल्लागार वैयक्तिक सल्ला देऊन, ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन आणि त्यांना सातत्याने पाठिंबा देऊन हे सुनिश्चित करतात की, ग्राहक टाटा एआयएसोबत राहण्याच्या आपल्या निर्णयाबाबत आश्वस्त राहू शकतील.
* https://members.mdrt.org/about-MDRT/company-rankings/
टीप: हे रँकिंग विमा एजंटांच्या नोंदणीकृत संख्येवर आधारित आहे


