पुणे, 14 फेब्रुवारी 2024: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 16 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत एके स्पोर्टस, पीवायसी हिंदु जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनराईज क्रिकेट स्कुल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात शिवेने भारद्वाज(नाबाद 111धावा व 4-16) याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर एके स्पोर्टस संघाने टेंभेकर फार्म्स संघावर 120धावांनी दणदणीत विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात अमेय देशपांडे(5-27) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने सनराईज क्रिकेट स्कूल संघावर 6 गडी राखून पहिला विजय मिळवला.
निकाल: साखळी फेरी:
एके स्पोर्टस: 38.4षटकात सर्वबाद 222धावा(शिवेने भारद्वाज नाबाद 111(96,17×4), स्वराज जवळकर 21, आयुष घोलप 27, अर्जुन ठाकुर 4-37, क्षितिज 2-27) वि.वि.टेंभेकर फार्म्स: 21.1षटकात सर्वबाद 102धावा(सिद्धांत बाफना 33(26,6×4), आयुष शर्मा 17, शिवेने भारद्वाज 4-16, सृष्टी भणगे 2-27); सामनावीर – शिवेने भारद्वाज; एके स्पोर्टस संघ 120धावांनी विजयी;
सनराईज क्रिकेट स्कूल : 32.5षटकात सर्वबाद 112धावा(ओम पवार नाबाद 25, इशान कुलकर्णी 22, ऋतुराज मुरकुटे 15, अमेय देशपांडे 5-27, विवान राउत 2-27) पराभुत वि. पीवायसी हिंदु जिमखाना: 25.3षटकात 4बाद 114धावा(साई बोऱ्हाडे 35(59,6×4), अथर्व वैद्य 19, नीलमेघ नागावकर नाबाद 14, श्लोक जोशी 14, शिवम गोरे 2-32); सामनावीर – अमेय देशपांडे; पीवायसी हिंदु जिमखाना संघ 6 गडी राखून विजयी.


