पुणे, विश्व संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे जनक असून नामाचा महिमा त्यांनी सर्व दूर पोहोचवला भोळ्या भाबड्या भक्तीने केलेले नामस्मरण देखील भगवंतापर्यंत पोहोचते अशी त्यांची साधना होती असे उद्गार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी काढले
विश्व संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळा तसेच कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या स्मरणिका प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते
भागवत धर्माची पताका विश्वात्मक प्रार्थना हे सारे नामदेव महाराजांनी आपल्या सहिष्णुवृत्तीने सर्व जगाला दाखवून दिले म्हणूनच ते विश्वसंत ठरले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप कुमार वायचळ प्रती शिर्डी शिरगावचे संस्थापक प्रकाश देवळे,सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर मा मोनिका मोहोळ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसराजेश पांडे, पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले,संस्थेचे उपाध्यक्ष भारत चुंबळकर आदी उपस्थित होते. रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर जेष्ठ व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता
संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा समावेश उल्लेखनीय होता संस्कृती आणि परंपरा टिकवण्याच्या माध्यमातून संस्थेने हजारो कुटुंबांना या माध्यमातून जोडण्याचे काम केले आहे असे मोनिकाताई मोहोळ म्हणाल्या
याप्रसंगी उद्योजक एकनाथ सदावर्ते, संजय वायचळ, संतोष हाबडे,समीर कोपरडे तसेच सुभाष मुळे संदीप लचके उपस्थित होते
याप्रसंगी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते
संस्थेचे उपाध्यक्ष भारत चुंबळकर तसेच रत्नाकर निरगुडे पंकज उतरावे हरीश पानसरे संजय बारटक्के किशोर सुपेकर सुनील बारटक्के वंदना कोर्टीकर स्मिता महिंद्रकर, नविता खोडके वर्षा बागडे सुप्रिया अवसरे यांचे विशेष सहकार्य लाभले
यावेळी समाजातील हजारो ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
विश्व संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे जनक- गहिनीनाथ महाराज औसेकर
RELATED ARTICLES


