Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedएजंटिक एआयद्वारे २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांना नवीन स्वरूप दिले जाणे अपेक्षित:...

एजंटिक एआयद्वारे २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांना नवीन स्वरूप दिले जाणे अपेक्षित: नवीन सर्विसनाऊ अहवाल २०२५

भारत, बुधवार ३०, जुलै २०२५: एजंटिक एआयद्वारे २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांना नवीन स्वरूप दिले जाणे अपेक्षित असून, भारत जगातील सर्वांत मोठ्या मनुष्यबळ रूपांतरणासाठी सज्ज आहे, असा निष्कर्ष पीअरसनसोबत सहयोगाने सर्विसनाऊ एआय स्किल्‍स रिसर्च २०२५ या नवीन प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. प्रक्रियाधारित कामांपासून हेतूप्रेरित नवोन्मेषापर्यंत स्थित्यंतर साध्य करण्याची तसेच कामाचे पूर्णपणे नवीन स्वरूपातील भवितव्य प्रत्यक्षात आणण्याची स्थित्यंतरात्मक संधी भारतातील प्रतिभावंतांच्या विस्तृत समुदायाला असल्याचा संकेत या परिवर्तनामधून मिळत आहे.

“एजेंटिक एआय मनुष्यबळाला नवीन आकार देत असल्याने तसेच २०३० सालापर्यंत १०.३५ दशलक्ष नोकऱ्यांचे स्वरूप बदलून टाकतानाच ३० लाखांहून अधिक नवीन तंत्रज्ञान नोकऱ्या निर्माण करणे अपेक्षित असल्याने भारताचा एआय प्रवास एका निश्चित वळणावर आहे,” असे सर्विसनाऊ इंडिया टेक्नोलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथुर यांनी सांगितले.

सर्विसनाऊच्‍या एआय मॅच्‍युरिटी इंडेक्‍सने (AI Maturity Index) भारतीय एआय पेससेटर्स (अनुकरणीय ठरण्याजोगे प्रगतीशील किंवा यशस्वी घटक) निश्चित केले आहेत. हे पेससेटर्स पाच अचूक मार्गांद्वारे या स्थित्यंतराचे नेतृत्व करत आहेत. हे पाच मार्ग म्हणजे एआयबाबतची सुस्पष्ट दृष्टी, प्लॅटफॉर्मकेंद्री विचार, प्रतिभेचे अचूक मिश्रण, भक्कम प्रशासन आणि अचूक मोजमापासह एजेंटिक एआयची अंमलबजावणी. याचा प्रभाव लक्षणीय आहे- ५७ टक्के आस्थापनांनी कार्यक्षमता व उत्पादनक्षमता सुधारल्याचे कळवले आहे.

”एआयसाठी सज्ज प्रतिभेचा विकास करणे, कार्यप्रवाहांची पुनर्रचना करणे आणि व्यवसाय प्रारूपांना सातत्याने नवोन्मेषाच्या दिशेने वळवत राहणे यांद्वारे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची स्थित्यंतरात्मक संधी भारताकडे आहे. भारतीय उद्योगांसाठी संदेश स्पष्ट आहे: विखुरलेल्या प्रयोगाचे युग आपल्या पाठीमागे आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी आता धाडसी कार्यान्वयन, एकात्मिक व्यूहरचना तसेच विश्वास, पारदर्शकता व कौशल्य यांच्यावर आधारित मानव-एआय यांचा अस्सल समन्वय यांची आवश्यकता आहे,” असे सुमीत माथुर यांनी सांगितले.

एजेंटिक एआयचे उपयोजन: १०.३५ दशलक्ष भारतीय नोकऱ्यांमध्ये काय बदलणार आहे?

नोकऱ्यांतील उत्क्रांतीच्या एका पटावर एआय स्किल्‍स संशोधनाने प्रकाश टाकला आहे:

● चेंज मॅनेजर्स आणि पेरोल क्लर्क्स यांसारख्या मोठ्या प्रमाणात स्वयंचलित असलेल्या कामांचे स्वरूप, पारंपरिक समन्वयकांची जागा घेणाऱ्या एआय एजंट्सद्वारे बदलले जात आहे.

● कार्यान्वयन सल्लागार आणि प्रणाली प्रशासकांसारख्या उच्चस्तरीय वाढीचा अंतर्भाव असलेल्या कामांमध्ये एआयशी स्पर्धा न करता एआयची मदत घेण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्पादन (८० लाख किंवा ८ दशलक्ष), रिटेल (७६ लाख किंवा ७.६ दशलक्ष) आणि शिक्षण (२५ लाख किंवा २.५ दशलक्ष) विभागांवर या स्थित्यंतराचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. या उद्योगांचे कामकाज आणि नवोन्मेष यामुळे अंतर्बाह्य बदलातून जाणार आहे.

जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या आणि गतीशील डिजिटल अर्थव्यवस्था यांच्यासह भारत पुढील पाच वर्षांच्या काळात ३० दशलक्ष तांत्रिक नोकऱ्यांची भर घालण्यास सज्ज आहे.

वाढीव गुंतवणूकांसह भारतीय उद्योगांची एआय मॅच्युरिटीच्या दिशेने वाटचाल

एआय मॅच्‍युरिटी इंडेक्‍समधून (AI Maturity Index) निदर्शनास येते की, रिअल-वर्ल्ड एआय तैनातीकरणाकडे जात असतानाच उद्योगांद्वारे एआय कन्फिग्युरेटर्स (६६ टक्के), एक्स्पीरियन्स डिझायनर्स (५७ टक्के) आणि डेटा साइंटिस्ट्स (६५ टक्के) आदी भविष्यकालीन नोकऱ्यांना प्राधान्य देत आहेत.

उद्योगांची समांतर पद्धतीने विस्तार करत राहण्याचीही महत्त्वाकांक्षा आहे आणि या अहवालाच्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की भारतीय कंपन्या प्रयोगांच्या आणि संकल्पनांच्या पुराव्यांच्या पलीकडे निर्धाराने वाटचाल करत आहेत, एआयचे व्यापक प्रमाणावर कार्यान्वयन करण्यासाठी धाडसी सज्जतेचे संकेत देत आहेत:

● तांत्रिक बजेटचा १३.५ टक्के भाग आधीच एआय स्वीकृतीसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

● २५ टक्के भारतीय उद्योग स्थित्यंतराच्या टप्प्यात आहेत- सिंगापोर (२० टक्के) आणि ऑस्ट्रेलिया (२१ टक्के) या बाजारपेठांना भारताने आधीच मागे टाकले आहे.

एआयचा समावेश करण्यासाठी कार्यप्रवाहांची पुनर्रचना करणाऱ्या उद्योगांनी उत्पादनक्षमता ६३ टक्के वाढल्याचे नमूद केले आहे.

अर्थात, एआयच्या या प्रवासात कौशल्ये आणि सुरक्षितता यांसारखी महत्त्वाची आव्हानेही आहेत.

भारताचा एआय प्रवास लक्षणीय गती साध्य करत असतानाच, काही आव्हानेही आहेत. आव्हानांच्या यादीत डेटा सुरक्षितता पहिल्या क्रमांकावर आहे, ३० टक्के भारतीय उद्योगांना डेटा सुरक्षिततेची चिंता भेडसावत आहे आणि हे प्रमाण या भागातील सर्वाधिक आहे. शिवाय, २६ टक्के कंपन्यांमध्ये भविष्यकाळात आवश्यक ठरू शकेल अशा कौशल्यसंचाबद्दल सुस्पष्टता नाही. धोरणात्मक दृष्टी आणि नवीन कौशल्यांचा रचनाबद्ध, बहुकार्यात्मक विकास करण्याचे मार्ग निश्चित करण्याची गरज तातडीने असल्याचे यावरून दिसून येते.

या संभाव्यतेची खऱ्या अर्थाने जोपासना करण्यासाठी भारतीय उद्योगांनी कर्मचाऱ्यांना एआय निष्पत्तीचे परीक्षण करण्यासाठी सक्षम तर केलेच पाहिजे, शिवाय त्यांना आकार देणाऱ्या प्रक्रिया व डेटाबद्दलही सक्रियरित्या प्रश्न उपस्थित करत राहिले पाहिजे. एआय-सक्षम कंपनी होणे म्हणजे विश्वास निर्माण करणे, स्वायत्ततेची जोपासना करणे आणि सर्व भूमिकांमधील मानवी संभाव्यता वाढवण्यासाठी एआयचा समावेश अखंडितपणे करत राहणे.

कामगारकेंद्री अर्थव्यवस्थेकडून एआयसक्षम अर्थव्यवस्थेकडे स्थित्यंतर करत असतानाच, जबाबदार नवोन्मेषाचे जागतिक मापदंड स्थापित करण्याची तसेच आपल्या संभाव्य प्रतिभेची संपूर्ण शक्ती खुली करण्याची ऐतिहासिक संधी भारताला आहे.

———————————————————-xx———————————————————

सर्विसनाऊची एआय मॅच्‍युरिटी इंडेक्‍स संशोधन पद्धती:

उद्योगामध्‍ये एआय परिपक्‍वतेच्‍या सध्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्विसनाऊने ऑक्‍सफोर्ड इकॉनॉमिक्‍ससोबत सहयोगाने जगभरातील ४,४७३ वरिष्ठ प्रमुखांचे सर्वेक्षण केले, ज्यामध्‍ये भारतातील ५११ प्रमुखांचा समावेश आहे. आघाडीच्या संस्था कामासाठी कशाप्रकारे एआयचा वापर करत आहेत हे ओळखण्यासाठी प्रोप्रायटरी इंडेक्सिंग मॉडेल विकसित करण्यात आले. अधिक जाणण्‍यासाठी सर्विसनाऊचे एंटरप्राइझ एआय मॅच्‍युरिटी इंडेक्‍स संशोधन येथे (here) वाचा आणि भारतासंबंधित तथ्‍य पत्रक येथे (here) पहा.

सर्विसनाऊची एआय स्किल्‍स संशोधन पद्धती:

सर्व्हिसनाऊने पीअरसनसोबत सहयोगाने हे संशोधन केले आहे. या टीमने जनगणना डेटा, जॉब बोर्ड आणि इतर सार्वजनिक कामगार बाजारपेठ डेटाचे विश्‍लेषण करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला. या डेटाच्या आधारे, पीअरसनने एक प्रोप्रायटरी ऑन्टोलॉजी तयार केली आहे, जी जागतिक अर्थव्यवस्थेत हजारो नोकऱ्या करण्यासाठी आवश्यक असलेली कामे, कौशल्ये आणि ज्ञान यांचे मूल्यांकन करते. पुढील पाच वर्षांत एआय जागतिक कौशल्य अर्थव्यवस्थेत कसा बदल करेल याचा अंदाज या निष्कर्षांवरून येतो. तसेच यामधून सर्विसनाऊ युनिव्‍हर्सिटीचा दृष्टिकोन देखील दिसून येतो, जेथे एआय युगात भरभराटीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्‍मसात करण्‍यास व्यावसायिकांना मदत करण्‍याचा मनसुबा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments