Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedलायन्स इंटरनॅशनलच्या वतीने सामाजिक उपक्रमांसाठी ३० लाखांचा निधी लायन्स इंटरनॅशनल ३२३४...

लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने सामाजिक उपक्रमांसाठी ३० लाखांचा निधी लायन्स इंटरनॅशनल ३२३४ डी २ च्या कॅबिनेट पदग्रहण सोहळ्यात लायन्स क्लब फाउंडेशन ला धनादेश सुपूर्त रक्तदान मोहीम आणि ई कचरा संकलन उपक्रमाचा शुभारंभ

पुणे : लायन्स इंटरनॅशनल ३२३४ डी २ चा कॅबिनेट पदग्रहण सोहळा ईशान्य सिम्बायोसिस ऑडिटोरियम येथे पार पडला. रक्तदान आणि ई कचरा संकलन मोहिमीचे उद्घाटन यावेळी झाले. कार्यक्रमात लायन्स क्लब फाउंडेशन ला ३० लाख रुपयांचा निधी विविध सामाजिक उपक्रमांसाठी प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात द्वितीय उपाध्यक्ष मनोज शहा व इंटरनॅशनल डायरेक्टर पंकज मेहता यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन विजय सारडा, माजी प्रांतपाल जितेंद्र मेहता, सीईओ रवी सातपुते, सीआयओ धनंजय धुमाळ, डिस्ट्रिक्ट ट्रेजरर आर. के. शहा, डिस्ट्रिक्ट लिओ प्रेसिडेंट दर्शन वैद्य, उपप्रांतपाल श्रेयस दीक्षित, उपप्रांतपाल राजेंद्र गोयल यांच्यासह सुमारे ४०० सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राजेश अग्रवाल,मनोज शहा यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. पंकज मेहता यांनी “लायन्सनी समाजासाठी काय करावे?” या विषयावर मार्गदर्शन केले. सीईओ रवी सातपुते यांनी आभार मानले. रश्मी नायर आणि रेखा पिल्ले यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments