Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांती दिनी विस्मृतीत गेलेल्या १०४० क्रांतीकारकांना अभिवादन ...

क्रांती दिनी विस्मृतीत गेलेल्या १०४० क्रांतीकारकांना अभिवादन श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने सारसबागेतील क्रांती स्तंभ येथे ध्वज वंदन आणि १०४० क्रांतीकारकांची यादी प्रकाशित होणार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सहकार्यातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून क्रांतीस्तंभाचे पुनरुज्जीवन

पुणे : श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने क्रांती दिनानिमित्त सारसबागेतील क्रांती स्तंभ येथे ध्वज वंदन करण्यात येणार आहे. यावेळी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले १०४० क्रांतीकारकांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. १८५७ पासून १९४७ च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी क्रांतीकारकांना या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक ९ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन आणि प्रकाशन होणार आहे.

रमेश भागवत म्हणाले, पूर्वी शनिवार वाड्यासमोर क्रांतीस्तंभ होता या क्रांतीस्तंभाचे उदघाटन कै.यशवंतराव चव्हाण ह्यांनी श्री वा.ब. गोगटे महापौर असताना १९५० साली केले होते . शनिवारवाडा पटांगणाच्या सुशोभिकरणाच्या वेळी पुणे महानगरपालिकेने क्रांतीस्तंभ सारसबागेत स्थलांतरित केला. सध्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून क्रांतीस्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. देवदेवेश्वर संस्थान मागील ५ वर्षे क्रांतीस्तंभासमोर ध्वजवंदन करीत आहे. तसेच क्रांतीकारकांची यादी संस्थानच्या कोथरुड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरात लावण्यात येणार आहे, असेही भागवत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments