सेलर कनेक्ट 2025 भारतभरातील अनेक शहरांमध्ये राबवले जात आहे. बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोईमतूर, पानीपत येथे याचे आयोजन या आठवड्यात पूर्ण झाले तर जयपूर, कोलकाता, इंदौर, सुरत, पानीपत, लुधियाना, इंदौर आणि अहमदाबाद येथे लवकरच होणार आहे.
· Amazon.in वर विक्रेत्यांना सणासुदीच्या काळात मोठे यश मिळवून देण्यासाठी हे आयोजन
· समृद्धी या सेलर सेंट्रल वरील नव्या सेल्फ एनेबलमेंट फीचरची घोषणा. ही सुविधा विक्रेत्यांना वाढीच्या संधी शोधता येण्यासाठी वैयक्तिकृत, डेटा-आधारित शिफारसी पुरविते.
राष्ट्रीय, 4 ऑगस्ट 2025: सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर हजारो विक्रेत्यांना या काळासाठी तयारी करता यावी याकरता अॅमेझॉन भारतभरात 13 शहरांमध्ये सेलर कनेक्ट्सचे आयोजन करत आहे. या सेलर कनेक्ट्स दरम्यान कंपनी बंगळुरू, मुंबई, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, सुरत, जयपूर, लखनऊ, पुणे, अहमदाबाद, पानीपत, लुधियाना आणि इंदौर यासारख्या मेट्रो आणि बिगर मेट्रो शहरांतील हजारो विक्रेत्यांशी संवाद साधणार आहे. सेलर कनेक्ट्स हा विक्रेत्यांना अॅमेझॉनसोबत थेट संवाद साधण्यासाठी एक प्रभावी मंच आहे. येथे त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळते आणि मास्टरक्लास मध्ये सहभाग घेता येतो. दिवसभर चालणाऱ्या या सत्रांमध्ये कॅटलॉग ऑप्टिमायझेशन, जाहिरात धोरण, कामकाज नियोजन आणि अॅमेझॉनच्या विक्रेत्यांसाठीच्या टूल्सचा प्रभावी वापर अशा महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट असतात. त्यामुळे व्यवसायांना सणासुदीच्या विक्री कालावधीत अधिक लाभ घेता येतो.
यावर्षीच्या सुरुवातीला अॅमेझॉनने अधिक युनिट ऑर्डरसाठी एक सरलीकृत फ्लॅट शीपिंग दर सुरू केला. त्यामुळे विक्रेत्यांना दुसरे युनिट पाठवताना 90% पर्यंत बचत करता येऊ शकते. जोडीला अॅमेझॉन सणासुदीच्या अधिक मागणीच्या काळात SMBs ना त्यांच्या व्यवसायात वाढ करता यावी यासाठी नवे उपक्रम राबवत आहे. यामध्ये समृद्धी या सेलर सेंट्रल वरील नव्या सेल्फ एनेबलमेंट फीचरचा समावेश आहे. हे फीचर विक्रेत्यांना जाहिराती आणि इन्व्हेंटरी प्लॅनिंगसाठी वैयक्तिकृत, डेटा-प्रणीत शिफारसी पुरविते. अलिकडेच अॅमेझॉनने आपल्या फुलफिलमेंट आणि डिलीव्हरी नेटवर्कच्या विस्ताराची घोषणा केली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत जलद आणि अधिक विश्वासार्ह सेवा देणे शक्य होत आहे.
“गेल्या काही वर्षांमध्ये अॅमेझॉन सेलर कनेक्ट हा एक प्रभावशाली प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आला आहे. भारतभरातील आमच्या विक्रेत्यांशी अर्थपूर्ण संवाद साधणे त्यामुळे शक्य होत आहे. विक्रेत्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि सणासुदीच्या उच्च मागणीच्या काळासाठी प्रभावीपणे तयारी करण्यासाठी नेमकं काय आवश्यक आहे हे आम्हाला या प्लॅटफॉर्ममुळे समजून घेण्यास सातत्याने मदत होत आहे. या उपक्रमामुळे विक्रेत्यांना अॅमेझॉनवरील विविध टूल्सचा अधिक प्रभावी वापर करता येतो, नियोजन व अंमलबजावणीत सुधारणा करता येते आणि अखेरीस, व्यवसायांना अधिक कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित बनण्यासाठी मदत करता येते. मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांच्या यशाला चालना मिळण्यात या उपक्रमाची मोलाची भूमिका आहे. आमचे विक्रेते यशस्वी झाले, तर आम्हीही यशस्वी ठरतो यावर आमचा ठाम विश्वास आहे,” असे अॅमेझॉन इंडियाचे डायरेक्टर सेल्स गौरव भटनागर यांनी सांगितले.
Amazon.in वरील विक्रेते बनकर टेक्सटाइल्सचे अमन जैन म्हणाले, “अॅमेझॉनच्या विस्तारित पायाभूत सुविधांनी आणि सरळ सोप्या प्रक्रियांनी आमच्यासारख्या पारंपरिक हातमाग व्यवसायांसाठी समान संधी तयार करून दिल्या आहेत. Amazon.in वर विक्रेता असण्यामुळे आम्हाला आमची अस्सल, पारंपरिक, हस्तनिर्मित उत्पादने भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवता आली. अलीकडे बंगळुरूमध्ये पार पडलेल्या सेलर कनेक्ट्सने सणासुदीच्या तयारीबाबत मौल्यवान माहिती दिली आणि निश्चित उद्दिष्ट ठेऊन विस्तार करण्याचा आमचा निर्धार अधिक दृढ केला. देशभरातील घरांमध्ये उच्च-गुणवत्तापूर्ण कारागिरीने बनवलेले कपडे पोहोचवण्यासाठी आम्ही आजवर कधीही नव्हतो एवढे उत्सुक आहोत.”
अॅमेझॉन इंडिया कडून विक्री सुलभ करण्यासाठी आणि SMBs साठी खर्च कमी करण्याच्या अलीकडील उपक्रमांवर आधारित, 2025 सेलर कनेक्ट हे एप्रिलमध्ये झालेल्या शुल्क कपातीच्या विक्रमी घोषणेनंतर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 300 रु. पेक्षा कमी किमतीच्या 1.2 कोटींहून अधिक उत्पादनांवर शून्य रेफरल शुल्क तसेच शीपिंग दरात कपात यांचा समावेश आहे. या बदलांमुळे विक्रेत्यांना लक्षणीय बचत करता येत आहे. विशेषतः दुसऱ्या युनिटवर 90% पेक्षा अधिक बचतीमुळे त्यांना अधिक स्पर्धात्मक दर देणे आणि पर्याय वाढवणे शक्य झाले आहे. याचा प्रभाव प्राइम डे 2025 मध्ये स्पष्ट दिसून आला. यावेळी SMBs च्या विक्री प्रमाणामध्ये वार्षिक 30% वाढ झाली आणि त्यापैकी 68% विक्रेते टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून होते. यातून अॅमेझॉनची उभरत्या बाजारपेठांमधील वाढती पोहोच आणि सर्वसमावेशक डिजिटल विकासासाठीची बांधिलकी ठळकपणे दिसून येते.


