Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंचेती हॉस्पिटल तर्फे अद्ययावत फिजिओथेरपी व पुनर्वसन विभाग सुरू – भारतातील सर्वांत...

संचेती हॉस्पिटल तर्फे अद्ययावत फिजिओथेरपी व पुनर्वसन विभाग सुरू – भारतातील सर्वांत प्रगत सुविधांपैकी एक

पुणे, ४ ऑगस्ट २०२५ : आर्थोपेडिक चिकित्सा व पुनर्वसन सेवांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असलेल्या संचेती हॉस्पिटल, पुणे यांच्यावतीने नवीन व अत्याधुनिक फिजिओथेरपी आणि पुनर्वसन विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागाचे उद्घाटन ५ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून ही सुविधा भारतातील सर्वांत अद्ययावत आणि मोठ्या पुनर्वसन केंद्रांपैकी एक ठरणार आहे.

ही माहिती संचेती हॉस्पिटल तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती,होम हेल्थकेअर आणि कम्युनिकेशन्स विभागाच्या संचालिका रूपल संचेती आणि फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ.दर्शिता नरवानी उपस्थित होते. प्रगत तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय कौशल्य आणि रूग्णकेंद्रित दृष्टिकोन यांद्वारे पुनर्वसन सेवांमध्ये नवे मापदंड निर्माण करण्याच्या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनावर या वेळी प्रकाश टाकण्यात आला.

या विभागाचे उद्घाटन पद्मभूषण व अर्जुन पुरस्कार प्राप्त, तसेच भारतासाठी शुटिंग क्रीडा प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकणारे अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात नामवंत मेंदूविकार तज्ज्ञ, आर्थोपेडिक शल्यविशारद, बालरोग तज्ज्ञ, क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या भविष्य केंद्रित विभागामध्ये न्युरो, आर्थोपेडिक, पेडियाट्रिक, वेस्टीब्युलर, कार्डिओ-रेस्पिरेटरी आणि स्पोर्टस् रिहॅबिलिटेशन अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट एकत्र येऊन समग्र, पुराव्यावर आधारित व वैयक्तिकृत उपचार प्रदान करतील.

या सुविधेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोबोटिक व इंटेलिजंट थेरपी सिस्टिम्सचे एकत्रीकरण. यात एक्सोस्केलेटल गेट ट्रेनिंग रोबोट्स, शोल्डर, हॅन्ड आणि कॉग्निटिव्ह रिहॅब रोबोट्स, अंडरवॉटर ट्रेडमिल, बॅलन्स मास्टर, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी थेरपी, आयसोकायनेटिक ट्रेनर्स, एफईएस, एफएमएस, बीएफआरटी, मॅट्रिक्स रिदम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, रोबोटिक हँड ट्रेनर्स, एडीएल-फोकस्ड हँड स्टेशन्स, फंक्शनल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन (FES), फंक्शनल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (FMS) आणि ब्लड फ्लो रिस्ट्रिक्शन थेरपी (BFRT) यांचा समावेश आहे.

या प्रणालींची रचना पुनर्प्राप्तीला गती देण्यासाठी, शरीराच्या हालचाली किंवा प्रभावित अवयवांचे कार्य पूर्ववत करण्यासाठी आणि हालचालीचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे.

संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती म्हणाले, “हा विभाग केवळ सुविधांचा विस्तार नाही, तर अचूक, वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञान-संपन्न रिहॅबिलिटेशन सेवांकडे घेतलेली एक मोठी झेप आहे. रूग्णांचे कल्याण आणि पुनर्प्राप्ती केंद्रस्थानी ठेवणारी भारतातील सर्वांत प्रगत सुविधा सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments