Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या सत्रात नवीन फ्रँचायझी टीम म्हणून...

इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या सत्रात नवीन फ्रँचायझी टीम म्हणून सहभागी

इंडव्हीलर्स ही पुण्यातील दुसरी फ्रँचायझी टीम ठरली असून, त्यामुळे स्पर्धेची तीव्रता आणि मोटरस्पोर्ट्सचा वारसा आणखी समृद्ध झाला आहे.
विक्रम धर आणि अजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही टीम मोटरस्पोर्ट्सवरील उत्कटता आणि व्यवसायिक दूरदृष्टी यांचा उत्तम संगम साकारते.

पुणे, 4 ऑगस्ट 2025 – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने आपल्या दुसऱ्या सत्रासाठी इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स प्रा. लि. या नवीन फ्रँचायझी टीमचे उत्साहाने स्वागत केले आहे. पुण्यातील दुसरी फ्रँचायझी ठरलेली इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स ही टीम लीगमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासोबतच शहराची राष्ट्रीय मोटरस्पोर्ट्स केंद्र म्हणून असलेली ओळख अधिक दृढ करणार आहे. या टीमची स्थापना मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ विक्रम धर यांनी केली असून, तरुण उद्योजक अजय अग्रवाल यांच्या सहमालकीत ही टीम आहे. ही टीम शर्यतीतील अनुभवसंपन्न वारसा आणि नव्या पिढीच्या व्यवसायिक नेतृत्वाचा अनोखा संगम आहे. भारतातील या प्रमुख सुपरक्रॉस लीगमध्ये स्वतःची ठसा उमटवण्यासाठी ही टीम सज्ज झाली आहे.
ऑफ-रोड मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले विक्रम धर हे खरे अर्थाने या क्षेत्रातील पायोनिअर मानले जातात. MXSTORE.in या भारतातील आघाडीच्या ऑफ-रोड गियर प्लॅटफॉर्मचे संस्थापक असलेल्या विक्रम यांनी व्यावसायिक शर्यतींचा अनुभव आणि कॉर्पोरेट नेतृत्व एकत्र आणत इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्सची घडण घडवली आहे. 2006 पासून ते एक उत्साही ऑफ-रोडर आहेत. ते 2017-18 च्या एमिरेट्स डेजर्ट चॅम्पियनशिप चे विजेते असून त्यांनी जागतिक पातळीवरील विविध भूभागांमध्ये स्पर्धा केल्या आहेत. त्याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ विभागीय संचालक पदांवरही कार्यरत राहिले आहेत. सह-मालक अजय अग्रवाल हे चार्टर्ड अकाउंटंट असून एक गतिशील उद्योजक आहेत. ते उद्योगधंद्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या नव्या नेतृत्वांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या आर्थिक दूरदृष्टी व आंतरराष्ट्रीय वितरण अनुभवामुळे टीमला धोरणात्मक बळ मिळाले आहे. इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्सने जागतिक पातळीवरील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आघाडीची कंपनी अरबियन कोस्ट ग्रुप यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ही भागीदारी भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टममध्ये जागतिक गुंतवणूकदारांची वाढती रुची अधोरेखित करते.
“प्रोफेशनलिझम आणि उत्कटतेवर आधारित, देशातील सर्वात सन्माननीय व कामगिरीकेंद्री सुपरक्रॉस टीम उभारणे हेच आमचं ध्येय आहे. इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स आगामी पिढीला शर्यतींसाठी प्रेरित करेल आणि भारतातील मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टमच्या दीर्घकालीन विकासात मोलाचा वाटा उचलेल,” असे विक्रम धर, संस्थापक व टीम प्रमुख, यांनी सांगितले.
भारतातील युवा वर्गामध्ये ISRL (इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग) ही फक्त एक शर्यत न राहता आता एक सांस्कृतिक चळवळ बनू लागली आहे, जिथे उच्च तीव्रतेचा अ‍ॅक्शन आणि प्रेरणादायक आकांक्षा यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. पुण्याची दुसरी टीम म्हणून इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्स BB Racing सोबत सामील झाल्यामुळे शहरातील स्पर्धात्मक स्तर अधिक बळकट झाला असून, पुण्याच्या मोटरस्पोर्ट्स हब म्हणून असलेल्या स्थानाला अधिक बळ मिळाले आहे. शहरात दोन टीम्स असणं म्हणजे केवळ स्पर्धा वाढवणं नाही, तर पुण्याला इंडियन सुपरक्रॉससाठी नवोदित प्रतिभांचा स्रोत बनवण्याचा मार्गही आहे. यामुळे चाहत्यांची गुंतवणूक वाढते, आणि नव्या पिढीतील रायडर्सना गवसणी घालण्यासाठी उपयुक्त पर्यावरण तयार होतं. ही विस्तार प्रक्रिया नवोदित रायडर्सना स्थानिक पातळीवर घडवण्यावर लक्ष केंद्रित करते, भारताच्या मोटरस्पोर्ट्स भविष्यासाठी भक्कम पाया घालते आणि शर्यतीसंबंधी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करून पुण्याला भारतातील रेसिंग क्रांतीच्या केंद्रस्थानी आणते.

ईशान लोखंडे, सह-संस्थापक आणि संचालक, ISRL म्हणाले, “इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्सचं ISRL कुटुंबात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विक्रम आणि अजय यांनी मोटरस्पोर्ट्सप्रती असलेली उत्कटता आणि व्यवसायिक दृष्टिकोन यांचा परिपूर्ण समतोल साधला आहे, जो ISRL च्या भारतातील सर्वात रोमांचक आणि व्यावसायिक मोटरस्पोर्ट्स इकोसिस्टम उभारण्याच्या ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. त्यांचा सहभाग आमच्या लीगच्या वाढीसाठी एक भक्कम मानदंड ठरतो आणि आगामी पिढीतील रेसिंग प्रेमींना प्रेरणा देतो.”
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगने (ISRL) आधीच संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे, विशेषतः बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांचं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार म्हणून लीगमध्ये सहभागी होणं ही एक महत्त्वाची घडामोड ठरली आहे.
इंडव्हीलर्स मोटरस्पोर्ट्सचं पदार्पण ISRL च्या दुसऱ्या सत्रात होणार असून, ही टीम क्रीडा, करमणूक आणि उद्योग यांच्या संगमस्थळी रणनीतीपूर्वक उभी राहणार आहे. शर्यतीप्रती असलेली सामायिक उत्कटता आणि समर्पित चाहतावर्ग उभारण्यावर केंद्रित दृष्टीकोन यामुळे ही टीम ISRL च्या भविष्याला आकार देणारी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ISRL अधिक भव्य शर्यती, उन्नत प्रेक्षक अनुभव आणि पूर्वी कधी न पाहिलेलं ब्रँड इंटिग्रेशन सादर करणार आहे. आज ISRL च्या फ्रँचायझी मालकांना क्रीडा, व्यवसाय आणि करमणूक यांच्यामधील महत्त्वाच्या जंक्शनवर उभं राहण्याची संधी मिळाली आहे, कारण भारत आता मोटरस्पोर्ट्सला एक मुख्य प्रवाहातील व्यावसायिक संपत्ती म्हणून स्वीकारू लागला आहे.
या रोमांचाचा भाग व्हा आणि #FlirtWithDirt हॅशटॅग वापरून ISRL ला सोशल मीडियावर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments