Tuesday, October 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स,...

दहाव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2024 स्पर्धेत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, कपिला परमार ऑल स्टार्स संघाची विजयी मालिका कायम

पुणे, 14 फेब्रुवारी 2024 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत साखळी फेरीत मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स, कपिला परमार ऑल स्टार्स संघांनी तिसरा विजय मिळवला.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मल्लिक अर्जुन(17धावा व 1-4) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जेटस संघाने पृथ्वी लायन्स संघाचा 23धावांनी पराभव केला.अरुण खट्टर(1-7 व 31धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर तलब टायटन्स संघाने व्हीके टायगर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

अन्य लढतीत प्रकाश कारिया(नाबाद 42 धावा व 1-5)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कपिला परमार ऑल स्टार्स संघाने क्वालिटी वॉरियर्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. भार्गव पाठक(1-1 व 33धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने व्हीएनएन वुल्व्हसचा 8 गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली. रौनक ढोले पाटील नाबाद 57 धावा व 1-8) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर फोर ओक्स सेलर्स संघाने जीएम टायफून्स संघाचा 10 धावांनी पराभव करून आगेकूच केली. आधिश शहा नाबाद 56 धावांच्या जोरावर ओबेरॉय आणि नील किंग्स ईगल्स संघाचा 43 धावांनी पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:
व्हीके टायगर्स: 6षटकात 6बाद 62धावा(विक्रम काकडे 24(9,3×4,2×6), राजेश बनसोडे 21(11,2×6), सुरज राठी 2-3, अरुण खट्टर 1-7, वीर मक्कर 1-14) पराभुत वि.तलब टायटन्स: 5षटकात 1बाद 63धावा(अरुण खट्टर 31(13,3×4,2×6), करण शर्मा नाबाद 26(16,3×4), अमित 1-9); सामनावीर – अरुण खट्टर; तलब टायटन्स संघ 7 गडी राखून विजयी;

जेटस: 6षटकात 4बाद 63धावा(चिराग लुल्ला 23(13,1×4,1×6), मल्लिक अर्जुन 17(8,3×4), साहिल मिलानी 10, संचित दिवाडकर 1-12) वि.वि.पृथ्वी लायन्स: 5षटकात सर्वबाद 40धावा(वरून 19, शरण सिंग 3-11, धवल गुंडेचा 2-3, मल्लिक अर्जुन 1-4); सामनावीर – मल्लिक अर्जुन; जेटस संघ 23धावांनी विजयी;

क्वालिटी वॉरियर्स: 6 षटकात 4बाद 71धावा(झियान तालब 28(15,3×4,1×6), आरव विज नाबाद 28(12,3×6), टोनी शेट्टी 12, प्रकाश कारिया 1-5)पराभुत वि.कपिला परमार ऑल स्टार्स: 5.3 षटकात बिनबाद 72धावा(प्रकाश कारिया नाबाद 42 (21,4×4,2×6), सर्वेश मुथा नाबाद 25(13,5×4));सामनावीर -प्रकाश कारिया; कपिला परमार ऑल स्टार्स संघ 8 गडी राखून विजयी;

व्हीएनएन वुल्व्हस: 6 षटकात 6बाद 39धावा(अकीलाक पूनावाला 11, उमेश पिल्ले 1-4, भार्गव पाठक 1-1, सिद्धांत धर्म 1-5) पराभुत वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स: 3.4 षटकात बिनबाद 43धावा(भार्गव पाठक नाबाद 33(14,2×4,3×6), सिद्धांत धर्मा नाबाद 9;सामनावीर-भार्गव पाठक; मनप्रीत अँड जॅग्वार्स संघ 8 गडी राखून विजयी;

फोर ओक्स सेलर्स: 6 षटकात 1बाद 84धावा(रौनक ढोले पाटील नाबाद 57(21,5×4,4×6), सुमिरन मेहता नाबाद 22(10,2×4,1×6), विनय मुत्याल 1-9)वि.वि.जीएम टायफून्स: 6 षटकात 3बाद 74धावा(अश्विन शहा 35(13,4×6), सुमेध गांगल 15, केदार नडगोंडे नाबाद 13, रौनक ढोले पाटील 1-8, सुमिरन मेहता 1-6); सामनावीर – रौनक ढोले पाटील; फोर ओक्स सेलर्स संघ 10 धावांनी विजयी;

ओबेरॉय आणि नील किंग्स: 6 षटकात बिनबाद 99धावा(आधिश शहा नाबाद 56(19,3×4,5×6), अमन पारेख नाबाद 41(17,5×4,2×6))वि.वि.ईगल्स: 6 षटकात 6बाद 56धावा(रोहन टोपे 16, अनमोल लिमये 15, आधिश शहा 1-16, प्रीतम लुणावत 1-11);सामनावीर -आधिश शहा; किंग्स संघ 43 धावांनी विजयी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments